युवकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:30+5:302020-12-15T04:30:30+5:30

अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी गावानजीक १५ नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९,३३७,३०४(अ) अन्वये रविवारी ...

Crime against four-wheeler driver in youth's death | युवकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

युवकाच्या मृत्यूप्रकरणी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

Next

अमरावती : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी गावानजीक १५ नोव्हेंबरला झालेल्या अपघातप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९,३३७,३०४(अ) अन्वये रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील जखमी दुचाकीस्वार युवक २० नोव्हेंबर रोजी दगावला.

पोलीस सूत्रांनुसार, राहुल संतोष देशमुख ( २८ रा. पलाश लेन, गाडगेनगर) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भात मृताचा लहान भाऊ पवन देशमुख (२५) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, राहुल हा मित्राकडे भोजनाकरिता गेला होता. दुचाकीने भातकुलीकडून अमरावतीकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रथम अमरावती व त्यानंतर नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याचा २० नोव्हे्ंबर रोजी मृत्यू झाला.

Web Title: Crime against four-wheeler driver in youth's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.