पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:14 AM2021-05-12T04:14:16+5:302021-05-12T04:14:16+5:30

--------------- शिराळा येथून बैल लंपास वलगाव : नजीकच्या शिराळा येथील श्रीधर सुधाकरराव बालपांडे (४१) यांच्या शेतातील गोठ्यातून पाच वर्षे ...

Crime against petrol pump manager | पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

Next

---------------

शिराळा येथून बैल लंपास

वलगाव : नजीकच्या शिराळा येथील श्रीधर सुधाकरराव बालपांडे (४१) यांच्या शेतातील गोठ्यातून पाच वर्षे वयाचा बैल लंपास करण्यात आला. १० मे रोजी ही घटना घडली. वलगाव पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------

एटीएमचे मोडेम, सीसीटीव्ही लंपास

अमरावती : रुक्मिणीनगर येथील खासगी कंपनीच्या एटीएमचे मोडेम व सीसीटीव्ही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार मनीष पनपालिया (५२) यांनी सोमवारी दाखल केली. चार हजार रुपयांचे हे साहित्य ८ ते ९ मे दरम्यान लंपास करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. राजापेठ पोलिसांनी भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.

---------------

चाकू मारून केले युवकाला जखमी

अमरावती : जेवडनगर येथे क्षुल्लक कारणावरून महेश राजकुमार नेतनराव (२५) या युवकाला अंकुश सोनटक्के व अभिषेक मेश्राम यांनी शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर अभिषेक मेश्रामने डोक्याच्या डाव्या बाजूला चाकू मारून जखमी केले. राजापेठ पोलिसांनी १० मे रोजी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३२३ , ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

महिलेला जिवे मारण्याची धमकी

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर बगीचानजीक बुधवारा परिसरातील २२ वर्षीय महिलेच्या दुचाकीचा पाठलाग करून तिला अडविण्यात आले व चाकू उगारून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. रविवारी सायंकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी सोमवारी अंकुश किशोर मेंढे (२३, रा. नंदा मार्केट) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३४१, ३५४ ड, ३५४ अ, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्यात प्रेमसंबंध होते व नंतर ब्रेकअप झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे.

Web Title: Crime against petrol pump manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.