९० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:14 AM2021-05-20T04:14:20+5:302021-05-20T04:14:20+5:30

अमरावती : ३० ग्रॅम सोने किंवा ३० ग्रॅम सोन्याची रक्कम व तडजोडीअंती ९० हजार रुपयांची मागणी ...

Crime against a police constable who demanded a bribe of Rs 90,000 | ९० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा

९० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस हवालदारावर गुन्हा

googlenewsNext

अमरावती : ३० ग्रॅम सोने किंवा ३० ग्रॅम सोन्याची रक्कम व तडजोडीअंती ९० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या गाडगेनगर ठाण्यातील डीबी स्कॉडमध्ये कार्यरत एका पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीअंती बुधवारी गुन्हा नोंदविल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

पोलीससूत्रानुसार, शेखर गणपतराव गेडाम (५२) असे आरोपीचे नाव आहे.. याप्रकरणी ३६ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. पथकाने २५ मार्च व ११ मे रोजी पडताळणी केली होती. गाडगेनगर ठाण्यात डिसेंबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोने तक्रारदार यांनी आरोपीकडून विकत घेतल्याचे आरोपीने तक्रारदारांना सांगून सदर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आरोपीने ३० ग्रॅम सोने किंवा ३० ग्रॅम सोन्याची रकमेची लाचेची मागणी करून तडजोडीअंती ९० हजारांची लाच मागणी केली. ११ मे रोजी आरोपीचे यांचेसह इतर सहकारी यांचा सहभाग असण्याच्या शक्यतेवरून इतर सहकाऱ्यांच्या पडताळणीकरिता एसीबीचे पथक पाठविले असता आरोपीने तक्रारदारावर संशय आल्याने त्याला दुसऱ्या गुन्ह्यात तातडीने अटक केली होती. आरोपीने तक्रारदारला आता पैशाची मागणी करणार नसल्याचे खात्री करून तक्रारदाराने दिलेल्या निवेदनानुसार व २५ मार्च रोजीच्या पडताळणी दरम्यान आरोपीने तक्रारदार यांना लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक, विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक, अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन, यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, संतोष इंगळे, पोलीस निरीक्षक, राहुल तसरे, एनपीसी प्रमोद धानोरकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Crime against a police constable who demanded a bribe of Rs 90,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.