बनावट कागदपत्राव्दारे नागालॅन्ड परिवहन कार्यालयात नोंंदणी केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:42+5:302021-06-25T04:11:42+5:30
अमरावती : एकाच वाहनाचे दोन वेळा नोंदणी क्रमांक करून खोेेटे दस्तावेज तयार करून त्याचा वापर केला. वाहनाची ...
अमरावती : एकाच वाहनाचे दोन वेळा नोंदणी क्रमांक करून खोेेटे दस्तावेज तयार करून त्याचा वापर केला. वाहनाची बनावट कागदपत्राच्या आधारे वाहनांची नागालॅन्ड परिवहन कार्यालयात नोंदणी करून अमरावती आरटीओची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून वाहनचालकांवर गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
दिलीप चिन्नास्वामी दोन्ती (रा. गुरुकृपा कॉलनी) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी एआरटीओ प्रशांत राजेंद्र देशमुख (३०, रा. अमरावती) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. आरोपीने टेम्पो टुव्हीलर एमएच ०४ जीपी ७५७६ यांचा आरटीओ कार्यालयात अभिलेखावर नोंद आहे. वाहनावर कर्जाची नोंद आहे. मात्र, आरोपीने बनावट कागदपत्राव्दारे वाहनाची नागालॅन्ड परिवहन कार्यालय येथे एनएलओ २ बी २९८४ अशी नोंदणी घेतली. सदर बसची नवीन एनओसी काढून वाहनाचा एमएच २७ बीएक्स ३२८४ अशी नोंदणी क्रमांक देण्यात आला. परंतु प्रादेशिक परिवहन वाहन क्रमांक एमएच ०४ जीपी ७५७६ व त्याचे एनएलओ २ बी २९८४ या दोन्ही वाहनाचे चेचिस क्रमांक एकच असल्याने निदर्शनास आले. आरोपीने वैद्यकीय फायदा करण्याच्या उद्देशाने शासनाच्या महसूलला चुना लावून फसवणूक केली. एकाच वाहनाचे दोन वेळा नोंदणी क्रमांक करून खोेेटे दस्तावेज तयार करून त्याचा वापर केला.