तुझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्याशी अफेअर; 'ती'च्या भावी पतीला 'त्याने' मेसेज केला, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 11:08 AM2022-06-06T11:08:22+5:302022-06-06T16:22:24+5:30

त्याने तिच्या मोबाइलवर सतत कॉल केले, तथा बोलण्याचा हेका धरला. कॉल उचलला नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझे माझ्यासोबत अफेअर आहे, असे सांगेन, अशी धमकी दिली.

crime charges against man for blackmailing woman over one sided love | तुझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्याशी अफेअर; 'ती'च्या भावी पतीला 'त्याने' मेसेज केला, अन्...

तुझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्याशी अफेअर; 'ती'च्या भावी पतीला 'त्याने' मेसेज केला, अन्...

googlenewsNext
ठळक मुद्देभेटण्यासाठी बळजबरी: पाठलाग करून विनयभंग

अमरावती : तुझ्या वाग्दत्त वधूचे माझ्याशी अफेअर आहे, असा संदेश टाकून एका तरुणीचा जुळलेला विवाह मोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. १२ जानेवारी ते २ जून दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी ३ जून रोजी दुपारी ४च्या सुमारास आरोपी गौरव खडेकर (रा.खडकीपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, ती तरुणी साईनगर परिसरातून तिच्या नातेवाइकाच्या घरी जाण्याकरिता निघाली की, आरोपी गौरव खडेकर हा तिचा पाठलाग करत होता. तिची इच्छा नसताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, काही दिवसांनी त्या तरुणीचे लग्न जुळले. त्याबाबत त्याला तरुणीने अवगत केले. मात्र, त्यानंतर त्याने तिच्या मोबाइलवर सतत कॉल केले, तथा बोलण्याचा हेका धरला. कॉल उचलला नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझे माझ्यासोबत अफेअर आहे, असे सांगेन, अशी धमकी दिली.

मात्र, त्यानंतर ती त्याला भेटली नाही की कॉलही उचलला नाही. पुढे त्याने ती धमकी प्रत्यक्षात उतरवत, तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मोबाइलवर तिच्याशी आपले अफेअर असल्याचा संदेश टाकला. त्यामुळे नियोजित लग्नप्रसंगात तेढ निर्माण झाली. आरोपी गौरव खडेकर एवढ्यावरच न थांबता, त्याने २ जून रोजी रात्री ९ वाजता तरुणीला कॉल करून, तू मला आताच भेटायला ये, तुझ्यासोबत बोलायचे आहे, अशी तंबी दिली. गौरव खडेकरच्या त्या अनन्वित छळाला कंटाळून अखेर त्या तरुणीने मनाचा हिय्या करत, ३ जून रोजी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा मापारी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: crime charges against man for blackmailing woman over one sided love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.