दोन शिक्षिकांकडून बॅंकेची २० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 04:48 PM2022-02-18T16:48:02+5:302022-02-18T16:51:02+5:30

दोन्ही महिलांनी बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी नोंदविण्यात आली.

crime charges file against two teachers for Bank fraud of Rs 20 lakh | दोन शिक्षिकांकडून बॅंकेची २० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

दोन शिक्षिकांकडून बॅंकेची २० लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देव्यवस्थापकांची तक्रार : दोन महिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

अमरावती : कारंजा लाड तालुक्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची बतावणी करून दोन शिक्षिकांनी साईनगरस्थित बॅंक ऑफ महाराष्ट्रची सुमारे १९ लाख १२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.

याबाबत बॅंकेचे अंचल प्रबंधक अनिल गिरसावळे (वय ५४, रा. कठोरा रोड, अमरावती) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी चांदूररेल्वे व बिच्छूटेकडी, अमरावती येथील दोन महिलांविरुद्ध विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ फेब्रुवारी २०२१ ते १७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ही घटना घडली.

तक्रारीनुसार, फिर्यादी हे साईनगर येथील महाराष्ट्र बँक येथे अचल प्रबंधक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या बँकेत एका महिलेने गृहकर्जाकरिता अर्ज केला होता. त्यादरम्यान आरोपीने शिक्षक असल्याचे भासवून २०१७ ते २०२० चे १६ नंबरचे फाॅर्म बँकेत दाखल केले. त्यासंबंधाने पत्ता व ओळख लागणारी कागदपत्रे विद्याभारती माध्यमिक विद्यालय, शहा (कारंजा लाड, जि. वाशिम) या संस्थेचे ओळखपत्र, वेतन प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड अकोला, डी अकोला डिस्ट्रीक सेंट्रल ऑफ लि, शाखा कारंजालाडमधील खाते क्र. ०७१०८२२०२००३९८३५ चे विवरण सादर केले होते.

त्या कर्ज अर्जामध्ये को-अप्लिकंट म्हणून अन्य एका महिलेनेदेखील तसाच अर्ज सादर केला होता. त्या अर्जाप्रमाणे दोन्ही महिलांना बँकेने १९ लाख १२ हजार ५०० रुपये कर्ज मंजूर केले होते व खात्यात जमा केले. दरम्यान, बँकेच्या स्थानिक मासोद तपोवन शाखेलादेखील एका शाळेची खोटी कागदपत्रे देऊन त्या दोन महिलांनी कर्जाची मागणी केल्याचे लक्षात आले. सबब, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकाळात सर्व कर्ज प्रकरणांची पडताळणी करून पाहिले असता, दोन्ही महिलांनी तेथेदेखील १६ नंबरचे फाॅर्म व शाळेचे बनावट शिक्के मारून त्याद्वारे बँकेकडे गृहकर्ज मिळण्याकरिता अर्ज सादर केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही महिलांनी बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी नोंदविण्यात आली.

Web Title: crime charges file against two teachers for Bank fraud of Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.