क्राईम : रहाटगाव, ट्रान्सपोर्टनगर, नागपुरी गेटमध्ये ‘हाफ मर्डर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 05:00 AM2022-03-21T05:00:00+5:302022-03-21T05:00:54+5:30

अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर अ. फहीम घराबाहेर येताच मकबूलशाहने  डाव्या हाताच्या दंडावर तलवारीने वार केला, तर आकीब (रा. रहेमतनगर) याने फरशाने वार केला.

Crime: 'Half Murder' at Rahatgaon, Transport Nagar, Nagpur Gate | क्राईम : रहाटगाव, ट्रान्सपोर्टनगर, नागपुरी गेटमध्ये ‘हाफ मर्डर’

क्राईम : रहाटगाव, ट्रान्सपोर्टनगर, नागपुरी गेटमध्ये ‘हाफ मर्डर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :  रंगपंचमीला अमरावती शहरात रक्तरंजित थरार घडला. तब्बल चार हाफ मर्डरची नोंद शहरातील पोलीस ठाण्यांनी घेतली. रोशननगर येथे आपसी वादातून सशस्त्र मारहाण करण्यात आली. रहाटगाव येथे हॉटेलात तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. ट्रान्स्पोर्टनगरातही एका युवकाच्या पायावर चाकुहल्ला चढविण्यात आला. पोलिसांनी या तिन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

रोशननगर  
नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील रोशननगर येथे तलवार, फरशा व पाईपने परस्परांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. १७ मार्च रोजी ट्रक लावण्याच्या वादातून परस्परविरोधी तक्रारींवरून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात अ. फहीम अ. रऊफ (३०, रा. रोशननगर) व मकबूलशाह हबीबशाह (५१, रा. रोशननगर) हे गंभीर जखमी झाले. अ. फहीम यांचे शेजारी मकबूलशाह याच्याशी १६ मार्च रोजी वाद झाला. त्यावरून १७ मार्चला सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास मकबूलशाह व अन्य चार जण शिवीगाळ करीत होते. त्यावर अ. फहीम घराबाहेर येताच मकबूलशाहने  डाव्या हाताच्या दंडावर तलवारीने वार केला, तर आकीब (रा. रहेमतनगर) याने फरशाने वार केला. मोईनशाह मकबूलशाह, फैजान नुरुद्दीन व गुड्डू शाह (रा. रहमतनगर) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे बयाण अ. फहीम यांनी नोंदविले. याप्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ व आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मकबूलशाह हबीबशाह याच्या तक्रारीवरून अ. फहीम अ. रउफ, अ. सज्जू अ. रऊफ  व अ. दानिश अ. रऊफ (सर्व रा. रोशननगर) यांच्याविरुद्ध कलम ३०७, ३४ गुन्हा नोंदविण्यात आला. समजावण्यासाठी गेला तेव्हा अ. फहीमने मकबूलशाहच्या डोक्यावर फरशा मारला, तर अ. सज्जूने त्याच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यात मकबूलशाह गंभीर जखमी झाला. 

रहाटगाव स्थित हॉटेल
रहाटगाव स्थित एका हॉटेलमध्ये २४ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. अक्षय सुनील इंगळे (२४, रा. दीपकनगर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. १८ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव पेठ पोलिसांनी राहुल विठ्ठलराव इंगळे (२८, रा. अर्जुननगर) विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अक्षय इंगळे हा मित्रांसमवेत रहाटगाव स्थित एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेला होता. राहुल याचा काउंटरवर वाद चालला होता. यादरम्यान अक्षयच्या ग्लासमध्ये काचेचा तुकडा पडल्याने तो गेला. त्यावेळी आरोपी हा चाकू घेऊन बाहेर आला व त्याने अक्षयच्या पोटावर चाकूने वार केले. अक्षयला काही मित्रांनी तातडीने इर्विनमध्ये हलविले. सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चोखट यांनी इर्विन गाठून जखमीचे बयाण नोंदविले.

ट्रान्स्पोर्टनगरात चाकुहल्ला 
ट्रान्सपोर्टनगर येथील आइस्क्रीम पार्लरजवळ शोएब परवेज अ. रशीद (३४, रा. जमील कॉलनी) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. १८ मार्चला रात्री ८.३५ च्या सुमारास डाव्या पायासह पाठीवर चाकूने वार करण्यात आले. शोएब परवेज हा ट्रान्स्पोर्ट मार्केटमध्ये चहा घेण्याकरिता गेला होता. त्याचा मित्र वाहन चालवित असताना तेथेच उभे असलेल्या काहींमधून खालिद पहिलवान व सै. आसिफ याने शोएबला शिवीगाळ केली, तर रफीक पहिलवानने शोएबला जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला चढविला. गाडगेनगर पोलिसांनी १९ मार्चला पहाटे शोएब परवेजच्या तक्रारीवरून रफीक पहिलवान, खालिद पहिलवान, इमरान मामू व सै. आसिफ (सर्व, रा. पठाण चौक) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title: Crime: 'Half Murder' at Rahatgaon, Transport Nagar, Nagpur Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.