Crime News: काहीही करेन म्हणत पत्नीचे काढले अश्लील व्हिडीओ, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:58 AM2023-06-27T11:58:01+5:302023-06-27T11:58:19+5:30
Crime News: लग्नाला उणेपुरे चार महिने होण्यापूर्वीच पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ व छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. मी तुझा पती आहे, अशी अधिकारवाणी वापरून त्याने पत्नीला व तिच्या आई-वडिलांना धमकी दिली.
अमरावती - लग्नाला उणेपुरे चार महिने होण्यापूर्वीच पतीने पत्नीचे अश्लील व्हिडीओ व छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. मी तुझा पती आहे, अशी अधिकारवाणी वापरून त्याने पत्नीला व तिच्या आई-वडिलांना धमकी दिली. २३ फेब्रुवारी ते २४ जूनदरम्यान अमरावती येथे ही कौटुंबिक छळाची मालिका चालली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी नवविवाहितेचा पती, सासू-सासरा व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, तरुणीचे अमरावती येथील आकाश नामक मुलाशी २३ फेब्रुवारीला मोर्शी येथे लग्न झाले. जावई व त्याच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून मुलीच्या वडिलांनी लग्नात सुमारे १२ लाख रुपये खर्च केला. लग्न होऊन ती सासरी गेली. तेव्हा सासू व नणंदेने तिच्याकडील दागिने, भेटवस्तू ताब्यात घेतल्या. लग्नाच्या तिसऱ्या-चौथ्या दिवसापासूनच तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. मुलीचा संसार पाहण्यासाठी घरी आलेल्या तिच्या आई-वडिलांनादेखील आकाशने मारहाण केली व धमकी दिली.
पतीने जबरीने पाजली दारू
पती आकाशने बेडरूममध्ये पत्नीचे अश्लील व्हिडीओ, फोटो काढले. तिच्या नकारानंतर मी तुझा पती आहे, मला व्हिडीओ काढण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे त्याने तिला बजावले. त्या कारणावरून पीडितेला मारहाणदेखील केली. पत्नीला दारूदेखील पाजली.