Crime News: आईने कालवले मुलाच्या संसारात विष, मुलाला सुनेपासून विभक्त ठेवले, चार लाखांसाठी छळ

By प्रदीप भाकरे | Published: December 20, 2022 12:57 PM2022-12-20T12:57:16+5:302022-12-20T12:59:42+5:30

Amrawati News: आईनेच मुलगा व सुनेच्या संसारात विष कालवले. मुलाला सुनेसोबत राहण्यास मज्जाव केल्याने सुनेला नाईलाजाने सहा महिने एकटीने काढावे लागले. त्याचा दुष्परिमाण संसारावर झाला. अन् एक चालता खेळत्या संसारातल तेढ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली.

Crime News: Mother poisoned son's life, kept son separated from daughter-in-law, tortured for four lakhs | Crime News: आईने कालवले मुलाच्या संसारात विष, मुलाला सुनेपासून विभक्त ठेवले, चार लाखांसाठी छळ

Crime News: आईने कालवले मुलाच्या संसारात विष, मुलाला सुनेपासून विभक्त ठेवले, चार लाखांसाठी छळ

Next

अमरावती - सासुनेच मुलगा व सुनेच्या संसारात विष कालवले. मुलाला सुनेसोबत राहण्यास मज्जाव केल्याने सुनेला नाईलाजाने सहा महिने एकटीने काढावे लागले. त्याचा दुष्परिमाण संसारावर झाला. अन् एक चालता खेळत्या संसारातल तेढ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. ३३ वर्षीय विवाहितेने अखेर १९ डिसेंबर रोजी मोर्शी पोलीस ठाणे गाठून पती,सासू व सासऱ्याविरूध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिचा पती प्रवीण खोबरागडे, सासरा नरेंद्र खोबरागडे व एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.

तक्रारकत्या तरूणीचे २६ जून २०२० रोजी नरेंद्रशी विवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीच्या घरी रहाटगावला गेली. पती, सासू-सासऱ्यांसह ती सासरी राहू लागली. त्या मंडळीने काही दिवस तिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर तुझ्या आई वडिलांनी लग्नामध्ये कोणत्याही मौल्यवान भेट वस्तू दिल्या नाहीत, त्यामुळे तू तुझे वडिलाकडून ४ लाख रुपये आण, असा तगादा पतीने लावला. आणण्यास नकार दिला असता, त्याने आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विवाहितेने म्हटले आहे. पतीने आपला अनन्वित छळ केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

भरोसा सेलमध्ये नाही झाला समेट
माहेरून पैसे न आणल्याने पती व सासुने तिला टॉर्चर केले. तथा सासुसासऱ्यांनी प्रवीण याला पत्नीसोबत राहण्यास मज्जाव केला. त्यामुळे सहा महिने ती एकटीच घरात राहिली. तो छळ थांबत नसल्याने अखेर तिने ४ ऑगस्ट रोजी पोलीसठाणे गाठले. ते प्रकरण भरोसा सेलला पाठविण्यात आले. मात्र तेथे दोघांमध्ये समेट घडून आला नाही. तसा अहवाल भरोसा सेलने संबंधित पोलीस ठाण्याला पाठविला. त्यामुळे १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime News: Mother poisoned son's life, kept son separated from daughter-in-law, tortured for four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.