११ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची नोंद एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:00+5:302021-09-04T04:17:00+5:30

अमरावती: शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्याच्या दैनंदिन अहवालात ‘डीसीआर’मध्ये सत्र न्यायालयात सुनावणीस येणाऱ्या प्रकरणांची माहिती जाहीर करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले ...

Crime record in 11 police stations with one click | ११ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची नोंद एका क्लिकवर

११ पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची नोंद एका क्लिकवर

Next

अमरावती: शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्याच्या दैनंदिन अहवालात ‘डीसीआर’मध्ये सत्र न्यायालयात सुनावणीस येणाऱ्या प्रकरणांची माहिती जाहीर करण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्याला निर्देश दिले आहेत. शहर पोलिसांच्या संकेतस्थळावरील डेली क्राईम रिपोर्ट या एका क्लिकवर ती माहिती सर्वांना पाहणे शक्य आहे.

शहरातील दहा पोलीस ठाण्यासह सायबर पोलिसांत नोंदविलेल्या गुन्ह्यांची माहिती शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर दैनंदिन स्वरूपात दिली जाते. त्यात फौजदारीसह, अदखलपात्र, जुगार, दारू तथा आकस्मिक मृत्यूची माहिती एकत्रितरीत्या दररोज टाकली जाते. तो डेली क्राईम रिपोर्ट अर्थात ‘डीसीआर’ पूर्वी दिवसाकाठी एकदा यायचा. आता तो दुपारी १२ व रात्री ८ असा दोनदा अपलोड केला जातो. त्यातच आता त्या दिवशी सत्र न्यायालयात बोर्डावर असलेल्या न्यायालयीन प्रकरणांची भर पडली आहे.

बॉक्स

न्यायालयीन प्रकरणांची माहिती

पोलीस ठाणे, अपराध क्रमांक, कलम, ते प्रकरण कुठल्या न्यायालयात सुनावणीस येणार आहे, त्या न्यायालयाचे नाव, आरोपी, साक्षीदार व सरकारी वकिलाचे नाव डीसीआरमध्ये दिले जात आहे. याशिवाय साक्षेचा प्रकारदेखील जाहीर करण्यात येत आहे.

////////////////////

एसपी कार्यालयाचा डीसीआर ई-मेलने

ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचे संकेतस्थळ आहे. मात्र, त्यावर डेली क्राईम रिपोर्ट अपलोड केला जात नाही. तो माध्यमांना ई-मेलने पाठविला जातो. गेली कित्येक महिने ग्रामीण पोलिसांचे संकेतस्थळ अपग्रेडेशन व मेंटनन्समुळे बंद होते.

Web Title: Crime record in 11 police stations with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.