इंधन दरवाढ आंदोलकांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:21+5:302021-06-10T04:10:21+5:30

अमरावती : शहरातील सहकारनगर येथील पेट्रोल पंपापुढे इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी संकेत श्रीखंडे, पवन मोकलकर, बबलू ...

Crimes against fuel price hike protesters | इंधन दरवाढ आंदोलकांविरुद्ध गुन्हे

इंधन दरवाढ आंदोलकांविरुद्ध गुन्हे

Next

अमरावती : शहरातील सहकारनगर येथील पेट्रोल पंपापुढे इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात सहभागी संकेत श्रीखंडे, पवन मोकलकर, बबलू कदम, शुभम इंदोरकर, सागर तायडे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा कलम १८८ व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. ७ जून रोजी आंदोलन करण्यात आले होते.

-------------

चोरट्याने बोरिंगचे वायर केले लंपास

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नदीप कॉलनीत राधेश्याम मेश्राम (६५) यांच्या बांधकाम होत असलेल्या घरातून बोरिंगचे वायर लंपास करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-----------------

मुलीच्या वाढदिवशी

पत्नीवर चाकूने वार

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू हनुमाननगर येथे मुलीचा वाढदिवस साजरा होत असताना योगेश मोतीराम पुंडकर हा मद्यपान करून घरी आला. मुलाला लाथाबुक्क्यांनी मारले आणि पत्नीला चाकूने जखमी केले. स्वत:ला मारून कुटुंबीयांना फसविण्याची धमकीदेखील त्याने दिली. गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपीला अटक करण्यात आली.

----------------

पोलिसांनी दिली चोरीची वर्दी

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी येथे एका युवकाला पोलिसाने चोरी होत असल्याची वर्दी दिली. ८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

पोलूस सूत्रांनुसार, सचिन संजय राऊत (२१) हा घरी झोपला असताना, एका इसमाला घेऊन पोलीस कर्मचारी त्याच्या घरी पोहोचला. तुझा कबुतराचा खोका आहे का? काही मुले हे पक्षी चोरून नेत आहेत, असे त्यांनी सचिनला सांगितले. त्यामुळे सचिनने कबुतराचा खोका असलेले ठिकाण गाठले. त्यावेळी पाच हजार रुपये किमतीचे १८ कबूतर पळविल्याचे निदर्शनास आले. त्याच्या तक्रारीवरून पहाटे साडेपाच वाजता गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------------------

थोडक्यात टळला दुचाकीस्वारांचा अपघात

बडनेरा : साईनगर स्थित पुष्पक कॉलनी येथे एमएच २७ बीएक्स ३७६९ क्रमांकाटा ट्रक रिव्हर्स घेत असताना दुचाकीवरील गजानन गाठे व त्यांचे वडील पुंडलिकराव गाठे तातडीने उतरल्याने त्यांचा अपघात टळला. मात्र, दुचाकीवरून ट्रक गेला. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.

------------------------

चेहऱ्याला मास्क नाही, पोलिसांकडून कारवाई

भातकुली : चेहऱ्याला मास्क नसल्याचे निदर्शनास आल्याने आशिष नारायणराव पवार (२४, रा. टेकडीपुरा) व अंकुश अरुण मानकर (३०, रा. वासेवाडी) यांच्याविरुद्ध भातकुली पोलिसांनी भादंविचे कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा नोंदविला. ८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

--------------

संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून कारवाई

वलगाव : चेहऱ्याला मास्क नसल्याचे निदर्शनास आल्याने लियाकत शाह सादिक शाह (२१, रा. गुलजारपेठ, चांदूर बाजार) व सलमान खान जलील खान (३०, रा. भूमिपुत्र कॉलनी, अमरावती) यांच्याविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. ८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

--------------

राजापेठ पोलिसांकडून दोघांवर कारवाई

अमरावती : चेहऱ्याला मास्क नसल्याचे निदर्शनास आल्याने मिलिंद दादाराव मुंदे (२६, रा. चिंचफैल) व गणेश विठ्ठलराव नवाथे (५६, रा. नवाथे चौक) यांच्याविरुद्ध वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. ८ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

--------------

भीमनगर येथे देशी दारू जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी भीमनगर येथून विनोद श्रीराम भालेराव (५२), प्रवीण सुरेश सातोकार (३१, दोन्ही रा. रहाटगाव) यांच्याकडून ४४४० रुपयांच्या देशी दारूच्या १२४ पावट्या जप्त केल्या. ७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

----------

पांढरी पुनर्वसन येथून दारू जप्त

भातकुली : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरी पुनर्वसन येथून दशरथ पुंडलिक कांबळे (६०) याच्याकडून ७२० रुपयांच्या देशी दारूच्या १२ पावट्या जप्त करण्यात आल्या. ८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

--------------

शिवभक्तांच्या भावना दुखावल्याची तक्रार

अमरावती : आरटीओ कॅम्प परिसरातील जिजाऊ पुतळ्याजवळ बूट घालून छायाचित्रण केल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात ६ जून रोजी दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम २९५, २९५ अ, ४४८ अन्वये राजेश रमेशकुमार मोटवाणी (रा. सिद्धिविनायक कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. निखिल बिजवे (३२, रा. सराफा बाजार) यांनी तक्रार नोंदविली.

-------------------

दामोदर कॉलनीत चोरी

पगाराची रक्कम लंपास

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामोदर कॉलनी येथील अरुण ठाकरे (४८) यांच्या घरातून ६ जून रोजी सकाळी ६ च्या सुमारास पगाराचे कपाटात ठेवलेले २५ हजार ७५० रुपये लंपास करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी फिरायला गेली होती, तर मुले घरात निजली होती. पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Crimes against fuel price hike protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.