महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 27, 2023 07:05 PM2023-03-27T19:05:28+5:302023-03-27T19:06:14+5:30

Amravati News राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला.

Crimes of treason against patriots and God-fearers during the Grand Alliance | महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

महाआघाडीच्या काळात देशभक्ती, देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे

googlenewsNext

गजानन मोहोड
अमरावती : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात देशभक्ती व देवभक्ती करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी येथे केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतली आहे. त्यावेळी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आधी शरयू नदीत डुबकी मारून प्रायश्चित करावे, मगच भाजपवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.

महसूल विभागाच्या आढावा बैठकीसाठी ना. विखे पाटील आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत सातत्याने अपमान केल्या जात असताना उद्धव ठाकरे यांना महाआघाडी करून अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेताना सुचले नाही. त्याचवेळी त्यांनी सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते. हे हिंदुत्वाचे बेगडी प्रेम असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे ते म्हणतात हे चुकीचे आहे. याउलट सत्तेकरिता त्यांनी हिंदुत्व सोडले. आता सत्ता गेल्यानंतर त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर आदर्श वाटू लागले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्याचवेळी त्यांनी आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे होते किंवा काँग्रेसला आघाडीतून बाहेर काढायला पाहिजे होते. त्यांनी हिंदुत्वाचा फक्त सत्ता मिळविण्यासाठी उपयोग केला. आता त्यांनी तो अधिकार गमाविला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पहिले भारतरत्न द्यावे, यासाठी आम्हाला अंबादास दानवेंच्या शिफारशीची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नेत्यांनी फारकत घेतली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जातात, त्याचे प्रायश्चित्त पहिले करा. नंतरच भाजपवर आरोप करा, असा सल्ला ना. विखे पाटील यांनी दिला.

‘भारत जोडो’दरम्यान ‘काँग्रेस छोडो’ सुरू
सत्ता गेल्याचे काँग्रेसला वैफल्य आहे. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत ४० चा आकडाही पार करू शकले नाहीत. जनतेने नाकारले हे वास्तव का स्वीकारत नाही, त्यासाठी यात्रा काढून पाहिल्या. प्रतिसाद मिळत नसल्याने राहुल गांधी सावरकरांवर आरोप करीत आहेत. त्यांनी आत्मविश्वास गमाविला आहे. जनता त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाही. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान इकडे काँग्रेस छोडो सुरू होते, यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे विखे पाटील म्हणाले.

Web Title: Crimes of treason against patriots and God-fearers during the Grand Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.