‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी

By admin | Published: May 30, 2017 12:12 AM2017-05-30T00:12:35+5:302017-05-30T00:12:35+5:30

स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावतीला हरताळ फासून उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध एका ‘निलाजऱ्या’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली.

Criminalization against 'Nilajara' | ‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी

‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी

Next

नवसारी परिसरात कारवाई : वडाळी परिसरात दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावतीला हरताळ फासून उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध एका ‘निलाजऱ्या’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली. उत्तर झोनचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक डी.पी.शिंदे यांनी याबाबत गाडगेनगर पोलिसांत कारवाईत अडसर निर्माण करणाऱ्यांविरुद्धही फिर्याद दाखल करण्यात आली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. महापालिका हद्दीतील कुठलीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणून १२ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालये देण्यात आली. त्यावर आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. याशिवाय सामुदायिक व सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यानंतर शहर हागणदारीमुक्त घोषित केले. शौचालयांची सुविधा दिल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. ज्या भागात लोक उघड्यावर शौचास जातात,अशा १६ जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्या १६ पैकी एक असलेल्या नवसारी परिसरातील मुक्त विद्यापीठ पॉवर हाऊस परिसरात सोमवारी उत्तर झोनचे गूड मार्निंग पथक पोहोचले. तेथे आर.एन.नाजूकधुर्वे हा व्यक्ती उघड्यावर जाताना आढळून आला. महात्मा फुले नगरातील अशोक इंगळे यांच्या घरी आपण पाहुणे म्हणून आल्याचे त्याने सांगितले. त्याबाबत इंगळे यांना विचारणा केली असता महापालिकेच्या पथकासोबत इंगळेसह सुनील नितनवरे यांनी वाद घातला. त्याअनुषंगाने तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत फौजदारी तक्रार करण्यात आल्याची माहिती उत्तर झोनचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक डी.पी.शिंदे यांनी दिली.
उत्तर झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. याशिवाय वडाळी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या एका व्यक्तीकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. हमालपुरा झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याच कालावधीत सहायक आयुक्त मंगेश वाटाणे यांच्या नेतृत्वात विटाभट्टी, फ्रेजरपुरा स्मशानात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. तथा नागरिकांना वैयक्तिक शौचालयासह सार्वजनिक, सामुदायिक शौचालयाचा वापराबाबत सक्त ताकिद देण्यात आली. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार हे शहर स्वच्छतेसाठी कमालीचे आग्रही आहेत.

आरएफओंना महापालिकेचे पत्र
वडाळी वनपरिक्षेत्रातील पारधीपुरा, वीटभट्टी परिसरातील नागरिक वनक्षेत्रात उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून आले आहे. त्यादृष्टीने या भागात आपण आपल्या स्तरावर गूड मार्निंग, गुड इव्हेनिंग पथक गठित करावेत, असे पत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी पाठविले आहे. जे नागरिक उघड्यावर जाताना आढळून येतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करावेत, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली.

Web Title: Criminalization against 'Nilajara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.