तिसऱ्या लाटेचे संकट, लहान मुलांचा ताप अंगावर काढू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:00+5:302021-08-01T04:13:00+5:30
(असाईनमेंट) अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अलर्ट आरोग्य विभागाने दिलेला आहे. यामध्ये लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण जास्त असेल, ...
(असाईनमेंट)
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अलर्ट आरोग्य विभागाने दिलेला आहे. यामध्ये लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण जास्त असेल, असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे लहान मुलांना ताप आल्यास अंगावर लक्षणे काढून नका. सध्या घराघरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आहेत. याशिवाय डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. त्यामुळे लहान मुलांना ताप आल्यास त्वरित डॉक्टारांचा सल्ला घ्यावा व आवश्यकता वाटल्यास कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
दोन महिन्यांपासून प्रशासनाद्वारा तिसऱ्या लाटेची तयारी सुरु आहे.. जिल्ह्याची जुलै महिन्याची पॉझिटिव्हिटी ०.६३ टक्के नोंद झालेली आहे. तरीही ऐनवेळी धावपळ नको, यासाठी आरोग्य विभागाद्वारा आतापासूनच तयारी सुरु आहे. यामध्ये लहान मुलांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती यासोबतच लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड व अन्य रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र बेडचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय औषधांचा साठा कमी पडून नये, यासाठी आवश्यक त्या अौषधांची मागणी देखील नोंदविण्यात आलेली आहे तसेच दोन खासगी रुग्णालयांतदेखील बालकांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेची तयारी प्रशासनस्तरावर सुरु असतांना जिल्ह्यात सध्या दोन आठवड्यांपासून पावसाळी वातावरण असल्याने व्हायरल तापाचे रुग्ण वाढले आहे. यासोबतच डासांची उत्पत्ती वाढल्याने तापांचे रुग्ण वाढले आहे व शासकीय अन् खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
पाईंटर
१५ वर्षांखालील रुग्ण : ५,२२६
कोरोनाचे रुग्ण : ९६,५०२
बॉक्स
सर्दी, खोकला, तापाची साथ
जिल्ह्यात सध्या ९ जुलैपासून सातत्याने पाऊस होत आाहे. हे वातावरण विषाणूजन्य आजाराला पोषक आहे. यातच डासांची उत्पत्तीदेखील वाढलेली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरीया व सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.
बॉक्स
बालकांसाठी कोरोना हॉस्पिटलमध्ये सुविधा
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथील कोविड रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आलेला आहे. याशिवाय तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवण्यात आलेले आहे. खासगी रुग्णालयामध्येही लहान मुलांसाठी कक्ष तयार करण्यात आलेले आहे. पीडीएमएमएसी रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची तयारी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
ताप आला म्हणजे कोरोना, असे नाही, पण...
* लहान, मोठ्यांना ताप आला म्हणजे कोरोनाचा संसर्ग झाला असे नाही, तर व्हायरल व अन्य आजाराममुळेही ताप येवून शकतो. डेंग्यू व कोरोनाची लक्षणे सारखीच आहे. या दोन्ही आजारांमध्ये ताप लवकर उतरत नाही.
* ताप आल्यास घाबरण्याचे कारण नाही, लक्षणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक त्या तपासणी कराव्यात व नियमित ओषधी घ्याव्यात.
कोट
तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होणार, असे म्हणतात. परंतु, आतापर्यंत कॉम्प्लिकेशन आढळलेले नाही. फ्लू एन्फ्ल्यूएन्झा रुग्ण आहेत. यासाठीची लस शासनाने मोफत देणे महत्त्वाचे आहे. हे आजार घरच्या घरी साध्या पॅरासिटॅमोलने बरे होतात. डेंग्यूचा ताप लवकर उतरत नाही, अंगदुखी, सांधेदुखीचा त्रास होतो, यासाठी आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
डॉ. अद्वैत पानट, बालरोगतज्ज्ञ