सीटी स्कॅनमागे कोरोनाग्रस्तांच्या आकड्यांचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:36+5:302021-05-06T04:12:36+5:30
नागरिक, व्यापारी विनामास्क फिरत असून, शारीरिक अंतराला फाटा देत असल्याची वास्तविकता आहे. कोरोना त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. आजार ...
नागरिक, व्यापारी विनामास्क फिरत असून, शारीरिक अंतराला फाटा देत असल्याची वास्तविकता आहे. कोरोना त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. आजार अंगावर काढत आहे. जास्त त्रास झाल्यास परतवाडा येथील खासगी रुग्णालयात औषधोचारासाठी जातात. तेथे सीटी स्कॅन करण्यावर भर दिला जात आहे. त्यानंतर हा अहवाल सार्वजनिक न करता औषधोपचार केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना बधितांचे खरे आकडे बाहेर येत नाही, ही वास्तविकता आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठी आहे. परंतु, सीटी स्कॅन अहवाल ग्राह्य ठरत नसल्याने शासनाकडे अचूक आकडे येत नाहीत. त्यामुळे सीटी स्कॅन लॅबवर बंदी घातली जावी, अन्यथा लॅबला अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक करावे, जेणेकरून वास्तविक आकडे पुढे येतील.
-----------------
आम्ही आयसीएमआरच्या गाईड लाईन व प्रोटोकॉलनुसार काम करीत आहोत. आम्ही सीटी स्कॅन करायला लावत नाही. कोरोनावरील उपचाराचे हे प्रभावी माध्यम नाही. माझ्या तालुक्यात जनरल फिजिशियन नाही तसेच सीटी स्कॅन सेंटर नाही.
डॉ. ज्योत्स्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी, चांदूर बाजार