पीकविमा; ३८ हजार शेतकऱ्यांनी टाळला सहभाग; ३१ जुलै रोजी संपली मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 11:12 AM2024-08-03T11:12:00+5:302024-08-03T11:12:43+5:30
Amravati : यंदा ४.७३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : पीकविमा योजनेत एक रुपयात सहभाग घेता येत असल्याने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी अंतिम दिवशी म्हणजेच ३१ जुलैपर्यंत ४७३२४५ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग नोंदविला आहे. त्यातुलनेत गतवर्षी ५,१०,०३३ शेतकऱ्यांनी अर्जाद्वारे सहभाग घेतला होता. परतावा टाळाटाळ होत असल्याने देण्यात ३२,५७४ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग टाळला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येतो. योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपया भरून पीकविमा संरक्षण प्राप्त होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबींचा पीकविम्यात समावेश करण्यात आला आहे. योजनेची मुदत १५ जुलै होती. मात्र, याचदरम्यान लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी केंद्रांमध्ये गर्दी होती व अनेक सेतू चालकांनी सीएससी केंद्रांचे परवाने घेतले आहेत. त्यामुळे केंद्रातील गर्दीमुळे योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८९.२१ टक्के शेतकऱ्यांनी पीकविम्यात सहभाग घेतला आहे.
पीकविमा जिल्हास्थिती
२०२३ २०२४
शेतकरी संख्या २,३४,५२५ २,६७,०९९
कर्जदार शेतकरी ४००९ ४,२१९
बिगर कर्जदार ४,६९,२३६ ५,०५,८१४
एकूण अर्ज प्राप्त ५,१०,०३३ ४,७३,२४५
पीकविमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी
अचलपूर तालुक्यात २६,०७५, अमरावती ३५,७२३, अंजनगाव सुर्जी ३५,६३४, भातकुली ४३१७३, चांदूर रेल्वे ३२,८६३, चांदूरबाजार ३२,१६२, चिखलदरा ६७६७, दर्यापूर ६३.५७३, धामणगाव रेल्वे ३७,२०९, धारणी १३,७८९, मोर्शी ३६,४४३, नांदगाव खंडेश्वर ६१,७१३, तिवसा २७,५५८ व वरुड तालुक्यात २०,५७३ जणांनी खरिपाचा पीकविमा काढला आहे.