शाखा प्रबंधकाने फाडली शेतकऱ्याची पीककर्जाची फाईल

By admin | Published: June 19, 2016 12:04 AM2016-06-19T00:04:35+5:302016-06-19T00:04:35+5:30

सततची नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी नवनवीन प्रकार बँकानी आरंभले आहे.

The crop manager's cropped file of the tornado farmer | शाखा प्रबंधकाने फाडली शेतकऱ्याची पीककर्जाची फाईल

शाखा प्रबंधकाने फाडली शेतकऱ्याची पीककर्जाची फाईल

Next

मोर्शीतील प्रकार : पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची फजिती
अमरावती : सततची नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी नवनवीन प्रकार बँकानी आरंभले आहे. पीककर्जातून जुने विहिरीचे कर्ज कपात करण्यास शेतकऱ्याने नकार दिल्याने मोर्शी येथील सेंट्रल बँकेच्या शाखा प्रबंधकाने पीककर्जाची कागदपत्रे चक्क फाडून टाकण्याचा प्रकार घडल्याची माहिती आहे.
येवती येथील शेतकरी वीरेंद्र नीळकंठराव कोराटे यांनी शेत सर्व्हे नं.८/१ (अ) १ हेक्टर ४४ आर करिता. पीककर्ज काढण्यासाठी सर्व कागदपत्रे सर्च रिपोर्ट घेऊन मोर्शी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखा प्रबंधकाकडे गेले होते. या शाखा प्रबंधकांनी कोराटे यांच्या खात्याची पाहणी केली असता त्यांच्याकडे यापूर्वी विहिरीचे एक लाख रुपयांचे कर्ज असल्याचे दिसून आले. बँकेद्वारा एक लाखाची केस मंजूर करण्यात येईल. यामधून ८० हजार रुपये विहिरीचे कर्ज व चालू कर्जातील १० हजार रुपयांचा हप्ता भरावा लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, कोराटे यांनी पीककर्जातून अन्य कर्जाची कपात करण्यास नकार देताच शाखा प्रबंधकाने पीककर्जाची सर्व कागदपत्रे काढून टाकली, असा आरोप कोराटे यांनी केला व याच आशयाचे निवेदन बँकेच्या अकोला येथील क्षेत्रीय प्रबंधक व शासनाला पाठविले.
यामध्ये शाखा प्रबंधकावर कारवाईची मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)

कोराटे यांच्याकडे २०१२ मधील विहिरीची सव्वा लाखावर थकबाकी आहे. या चार वर्षांत त्यांनी एकही हप्ता भरलेला नाही तसेच शाखा प्रबंधकांनी पीककर्जाचे कागदपत्रे फाडण्याचा प्रकार घडलाच नाही. हा खोटा आरोप आहे.
सुनील रामटेके
व्यवस्थापक, अग्रणी बँक

Web Title: The crop manager's cropped file of the tornado farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.