कोरोना उपाययोजनांसाठी कोटींची उड्डाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:11+5:302021-06-20T04:10:11+5:30

गजानन मोहोड अमरावती : कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर जिल्ह्यातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत २२ कोटी सहा ...

Crores of flights for corona measures | कोरोना उपाययोजनांसाठी कोटींची उड्डाने

कोरोना उपाययोजनांसाठी कोटींची उड्डाने

Next

गजानन मोहोड

अमरावती : कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर जिल्ह्यातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत २२ कोटी सहा लाख १४,९५२ रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे. हा सर्व निधी ‘एसडीआरएफ’ने (राज्य आपत्ती निवारण फंड) जिल्ह्याला उपलब्ध केलेला आहे. याशिवाय अन्य हेडवरचा निधीदेखील या विभागांनी खर्च केलेला आहे. जिल्ह्यात उपलब्ध निधी पाहता एका व्यक्तीमागे ७९ रुपयांचा खर्च या कालावधीत झालेला आहे.

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल २०२० ला झाली असली तरी त्याचे एक महिना अगोदरपासून प्रतिबंधित उपाययोजना जिल्हा व आरोग्य यंत्रणेद्वारा राबविण्यात येत आहे. सुरुवातील २३ मार्चपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले. या काळात विस्थापित झालेल्या परिवारांना निवारा व व त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व १४ ही तालुका मुख्यालयी व्यवस्था करण्यात आली. या परिवारांना प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्यात आल्या होत्या.

याशिवाय कोरोना टेस्टिंग, डेडीकेटेड कोरोना केअर सेंटरची उभारणी प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी करण्यात आली. कंटेनमेंट झोन, मास्क, सॅनिटायझर, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, याशिवाय आवश्यक औषधी व इतर साधनांसाठी हा निधी खर्च करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण तीन टप्प्यात निधी उपलब्ध झाला. यामध्ये पहिल्या टप्प्यात १ कोटी ४५ लाख ९८ हजार, दुसऱ्या टप्प्यात १८ कोटी, १३ लाख ४३ हजार ९५२ व तिसऱ्या टप्प्यात २ कोटी ४६ लाख ७३ हजारांचा निधी साधारणपणे १५ शासकीय आस्थापनांना उपलब्ध करण्यात आलेला आहे. यापैकी शिल्लक असलेल्या निधीमधून अजूनही उपाययोजना सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बॉक्स

एका नागरिकामागे ७९ रुपयांचा खर्च

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आतापर्यंत राज्य आपत्ती व्यवस्थापनाचा २२,०६ कोटींचा खर्च झालेला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख गृहीत धरता प्रतिव्यक्ती ७८ रुपये ७९ पैशांचा खर्च झालेला आहे. याशिवाय एनआरएचएम, एनएचएम, महापालिका व जिल्हा परिषदेचा शेष फंड यामधूनही निधी खर्च झाला असल्याने प्रतिव्यक्ती ८५ ते ९० रुपयांचा खर्च झाला असल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

या उपायोजनांसाठी निधी खर्च

कोरोना संसर्गाचे सुरुवातीच्या काळात निवारे, विस्थापित कुटुंबांना भोजन, आवश्यक औषधी, एन-९५ व कापडी मास्क, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण, कंटेनमेंट झोनकरिता लागणारे स्टँड, फलक, डेडिकेटेड कोरोना केअर सेंटर, रुग्णवाहिका, कंत्राटी कर्मचारी, स्टेशनरी याशिवाय आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आदी उपाययोजनांवर हा निधी खर्च झालेला आहे.

बॉक्स

कोरोना जिल्हा सद्यस्थिती

जिल्ह्यात आतापर्यंत ९५,४५४ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याशिवाय उपचारादरम्यान १,५३९ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे, याची १.६१ इतकी टक्केवारी आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने ९२,९९४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ही उच्चांकी ९७.३२ टक्केवारी आहे. याशिवाय जिल्ह्यात पॉझिटिव्ह नोंद झालेल्या अन्य जिल्ह्यातील १७७ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे.

कोट

०००००००००००००

०००००००००००००००

शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी

पाईंटर

असा मिळाला एसडीआरएफचा निधी

जिल्हा शल्यचिकित्सक : १,६०,४८,०००

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश : २,००,०००

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश : ५,३४,७९५

जिल्हा आरोग्य अधिकारी : १०,६६,८४,५७६

जिल्हा पुरवठा अधिकारी : ७,०९,४५०

पोलीस आयुक्त : ४३,००,०००

जिल्हा पोलीस अधीक्षक : ४८,२५,०००

सीईओ, जिल्हा परिषद : १०,००,०००

समादेशक, रारापो बल क्र ९ : ४,४३,७४०

आयुक्त महानगरपालिका : ५,८८,०६,८३०

अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह : १,२५,०००

नोडल ऑफिसर विद्यापीठ लॅब : २,५९,३७,५६१

सीईओ, एम्स नागपूर : १०,००,०००

Web Title: Crores of flights for corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.