१५ व्या वित्त आयोगाचा कोटयावधीचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:15+5:302021-07-30T04:13:15+5:30
अमरावती: ग्रामपंचायतींना निवडणूकीपूर्वी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना आता पर्यत चार टप्यात ३६ कोटी ...
अमरावती: ग्रामपंचायतींना निवडणूकीपूर्वी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींना आता पर्यत चार टप्यात ३६ कोटी २० लाख ४० हजार रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मिळालेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर गत ७ महिन्यापासून पडून आहे.
जिल्हा परिषदेला शासनाकडून पंधराव्या वित्त आयोगाचा चार टप्यात प्रत्येकी ८० टक्याप्रमाणे ३६ कोटी २० लाख ४०हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला होता.हा निधी पंचायत विभागाने शासनाचे सूचनेप्रमाणे १४ तालुक्यातील ८३९ ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत केला आहे.सदरचा निधी सर्व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केलेला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना कुठली विकास कामे करता येतात.याबाबत यापूर्वीच शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्यानुसार ग्रामपंचायतींनी गाव विकास आराखडयानुसार काही कामे सुध्दा केली आहेत.परंतु यावर होणारा निधी खर्चाचा लेखाजोखा हा पीएफएमएस प्रणालीव्दारेच करणे आवश्यक आहे.परंतु या प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना खर्च करण्यास अडचणी येत आहेत.त्यामुळे कोटयावधी रूपयाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यावर पडून आहे.
बॉक्स
खर्चाची नोंदीची अडचण
ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातंर्गत निधी खर्च करतांना पीएफएमएस या प्रणालीव्दारे खर्च होणार असल्याने या प्रणालीत तांत्रिक अडचणीत येत आहेत.अशातच खर्चाची नोंद होत नाही. परिणामी खर्चाची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येते.
बॉक्स
तालुकानिहाय ग्रा.प.ना उपलब्ध निधी
अमरावती २,८५३५०६६,भातकुली २०८३९६६४,नांदगाव खंडेश्र्वर २३८९८६५८,चांदूर रेल्वे १६१६८७३४,धामनगांव रेल्वे २२४२४४९१,तिवसा १८६८७८८४,मोर्शी २९९५३०९६,वरूड ३०३७०८५०,चांदूर बाजार ३४१८०८५०,अचलपूर ३३१९९७११,अंजनगाव सुजी २०७८६०९३,दर्यापूर २८०९३४४८,धारणी ३३३४३५९१,चिखलदरा २१५५७८६४ या प्रमाणे ग्रामपंचायत निहाय लोकसंख्येच्या प्रमाणात चार टप्यात प्रत्येकी ३६ कोटी २० लाख ४० हजार रूपयानुसार निधी उपलब्ध करून दिला असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.