जिल्हा परिषदपेक्षा पंचायत समितीसाठी उमेदवारांची गर्दी
By admin | Published: February 9, 2017 12:07 AM2017-02-09T00:07:48+5:302017-02-09T00:07:48+5:30
जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा ज्वर सध्या ग्रामीण भागात तापू लागला आहे.
निवडणूक : १३ फेब्रुवारीला अंतिम चित्र होणार स्पष्ट
अमरावती : जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा ज्वर सध्या ग्रामीण भागात तापू लागला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या छानणीनंतर जिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी ५१६ उमेदवारा पेक्षा १० पंचायत समितीच्या ८८ गणात ६५७ उमेदवारांचे नामांकन अर्ज कायम आहेत.त्यामुळे आता १३ फेब्रुवारी या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्राच ७ फेब्रुवारी रोजी छानणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. त्यानंतर तुर्तास जिल्हा परिषदेच्या ५९ व पंचायत समितीच्या ८८ गणातील कायम असलेल्या उमेदवारांची संख्या ही पंचायत समिती पेक्षा कमी आहे. तर पंचायत समितीसाठी सर्वाधिक अर्ज सध्यातरी कायम असल्याने यात उमेदवारांची तोबा गर्दी असल्याचे दिसून येते.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५१६ आणि पंचायत समितीच्या ६५७ उमेदवारापैकी किती उमेदवार नामांकन परत घेतात याबाबतचे अंतिम चित्र १३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे.त्यामुळे सध्या ग्रामीण भागात बंडोबाना थंड करण्यासाठी सर्वच गट आणि गणात उमेदवार व राजकीय पक्षाच्या नेत्याना कसरत करावी लागणार.(प्रतिनिधी)
तिन झेडपी गटात गर्दीे
जिल्हा परिषदेच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद आणि धारणी तालुक्यातील हरिसाल या दोन जिल्हा परिषदेच्या गटात तसेच अचलपूर गटात प्रत्येक १६ नामनिर्देशनपत्र छानणीत वैध ठरले आहेत. त्यामुळे आता या मधून किती उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतात याकडे वरील तिनही सर्कल मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कापूसतळणी गणात १९ इच्छूक
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी या पंचायत समितीच्या गणात जिल्हाभरातील इतर पंचायत समितीच्या गणापेक्षा सर्वाधिक १९ नामनिेर्दशनपत्र वैध ठरले आहेत. त्यामुळे आता यामधून रिंगणाबाहेर किती जण निघतात याकडे राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहेत.