बाप्पाच्या दर्शनाला अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:02 PM2017-09-04T22:02:20+5:302017-09-04T22:02:43+5:30

सोमवारपासून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरातील काही मोठ्या मंडळांनी तयार केलेले नेत्रदीपक देखावे बघण्यास ....

The crowd gathered in front of Bappa's eyes | बाप्पाच्या दर्शनाला अलोट गर्दी

बाप्पाच्या दर्शनाला अलोट गर्दी

Next
ठळक मुद्देआज निरोप : रविवार, सोमवारी भक्तांची मांदियाळी, कडेकोट बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोमवारपासून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरातील काही मोठ्या मंडळांनी तयार केलेले नेत्रदीपक देखावे बघण्यास व गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारी व सोमवारी रात्री अलोट गर्दी केली होती. रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे भक्तांची मांदियाळी होती.
इर्विन चौकातील खापर्डे बगिचानजीकच्या विदर्भाच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भक्तांनी रांगा लावल्या तर टोेपेनगरात साकारलेला सुवर्ण मंदिराचा देखावा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. परकोटाच्या आतील प्रसिद्ध नीळकंठ गणेशोत्सव मंडळ, अनंत गणेश मंडळ, लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळासह विविध मंडळांनी यंदाही सुरेख देखावे साकारले आहेत. रूख्मिणीनगर गणेशोत्सव मंडळ सायन्सकोर येथे सुद्धा प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत तेजी आली आहे. विविध प्रकारचे साहित्य, भाजीपाला, फळे, हार, पूजेच्या वस्तुंमध्ये कोट्यवधींची उलाढाल या दिवसांत झाली.
जिल्ह्यातील २०७ गणेशमूर्तींचे विसर्जन
८० टक्के पोलीस यंत्रणा बंदोबस्तात

अमरावती : जिल्ह्यात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून सोमवारी जिल्ह्यातील २०७ बाप्पांना भक्तांनी निरोप दिला. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषांनी जिल्हा दणाणून गेला होता. गणेश विसर्जनासाठी जिल्हाभरात पोलिसांचा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल ८० टक्के पोलीस विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यंदा जिल्ह्यात १ हजार १७३ मंडळांनी गणपतीची स्थापना केल्याची पोलिसांकडे नोंद आहे. आता गणेश विसर्जनाची लगबग सुरू झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील ग्रामीण भागात १६४ व शहरी भागात २० गणेश मंडळांनी थाटात विसर्जन केले. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी २३ गणेश मंडळांनी विसर्जन केले असून दिवसभर मिरवणुका निघत होत्या. आयुक्तालय हद्दीतील मंडळांमध्ये ५ सप्टेंबर रोजी १९३, ६ रोजी १६४, ७ रोजी ८३ अशाप्रकारे गणेश मंडळांद्वारे गणेशमूर्र्तींचे विसर्जन केले जाईल. जिल्हाभरातील गणेश मंडळे आता विसर्जनाच्या तयारीला लागली असून पोलीस देखील डोळ्यांत तेल घालून लक्ष देत आहेत.

Web Title: The crowd gathered in front of Bappa's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.