चिरडल्याने मृत्यू ट्रक पेटविला, लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 06:00 AM2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:43+5:30

मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारूविक्री दुकानात कामगार होते.

Crushed to death truck burnt, stoned | चिरडल्याने मृत्यू ट्रक पेटविला, लाठीमार

चिरडल्याने मृत्यू ट्रक पेटविला, लाठीमार

Next
ठळक मुद्देकामगाराला धडक : चपराशीपुरालगतच्या राहुलनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका कामगाराला चिरडले. घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चपराशीपुरा परिसरातील जुना बायपास लगतच्या राहुलनगर येथे ही घटना घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटविला.
मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारूविक्री दुकानात कामगार होते. सायकलने घराकडे जेवणाकरिता जात असताना रस्ता ओलांडतेवेळी बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (एम.एच. २७ बीएक्स ९७९९) ने त्यांनी चिरडले. ट्रकच्या पुढील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रारंभी संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. त्यानंतर तो पेटविला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.
नागरिकांचा विरोध शमल्यानंतर महापालिका अग्निशमन वाहनाने पाण्याचा मारा करून पेटता ट्रक विझविला.

जमावाने ट्रक पेटविला होता. अग्निशमन यंत्रणेला जमाव दगडफेकद्वारे मज्जाव करीत होता. त्यामुळे संप्तत जमावाला पांगविण्यासाठी आणि स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीहल्ला करण्यात आला.
- पुंडलिक मेश्राम
ठाणेदार, फ्रेजरपुरा

Web Title: Crushed to death truck burnt, stoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात