करबुडव्या सहा खदानी करणार सील

By admin | Published: March 29, 2016 12:09 AM2016-03-29T00:09:49+5:302016-03-29T00:09:49+5:30

अतिरिक्त उत्खनन करुन गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी २९ मार्च रोजी सील केल्या जाणार आहेत.

The crusher will make six appraisal seals | करबुडव्या सहा खदानी करणार सील

करबुडव्या सहा खदानी करणार सील

Next

दोन कोटी थकीत : महसूल विभागाने नोटीस बजावली
अमरावती : अतिरिक्त उत्खनन करुन गौण खनिज रॉयल्टीची रक्कम न भरणाऱ्या सहा खदानी मंगळवारी २९ मार्च रोजी सील केल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने महसूल विभागाने खदान संचालकांना नोटीस बजावल्या असून करापोटी त्यांच्याकडे दोन कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार महसूल करबुडव्यांविरुद्ध ठोस कारवाई केली जात आहे. अमरावती तहसील अंतर्गत सहा खदानींकडे रॉयल्टीचे दोन कोटी रुपये थकीत आहेत. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियम) नियम २०१३ चे उपनियम ३३ नुसार खदान संचालकांना वारंवार नोटीस बजावून थकीत रॉयल्टीची रक्कम अदा करण्याबाबत महसूल विभागाने कळविले आहे. मात्र, खदान संचालकांनी महसूल विभागाच्या या नोटीसला फार गांभीर्याने घेतले नाही. २६ मार्च रोजी महसूल विभागाने खदान संचालकांना नोटीस बजावली असताना रॉयल्टीची रक्कम भरली नाही. परिणामी २९ मार्च रोजी खदानी सील केल्या जातील. ही धडक कारवाई करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. खदानी सील करताना पाणी, वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खदान क्र. २०२, ६८, ८१, १६८, १९४ व ६९ यांच्यावर ही कारवाई केली जाईल. त्यानुसार महसूल विभागाने तयारी केली असून मंगळवारी खदान सील करुन त्या ताब्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

खदान सील करण्यासाठी यांना बजावल्या नोटीस
महसूल विभागाकडून मंगळवारी सहा खदानी सील केल्या जाणार आहेत. यात मासोद येथील अंबादास शेळके, सुभाष तायडे, विनोद मुधोळकर तर परसोडा येथील सचिन राजुरकर, शेवती येथील नीलिमा पिंपळकर व सचिन राजुरकर आणि उदखेड येथील मनोज कपूर या खदान मालकांचा समावेश आहे.

बडनेऱ्यात दोन वीट भट्ट्यांवर कारवाई
बडनेरा कोंडेश्वर मार्गालगतच्या दोन वीट भट्ट्यांवर रॉयल्टी थकीत असल्याप्रकरणी महसूल विभागाने सोमवारी कारवाई केली. वासेवाय आणि राजेंद्र दारोकार यांच्या वीट भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. थकित रक्कम भरण्यात आली नाही तर साहित्य जप्त केले जाईल, असे महसूल विभागाने सांगितले.

महसूल नियमानुसार रॉयल्टीची दोन कोटी रुपये रक्कम थकीत असल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. खदान मालकांना थकीत रक्कम भरण्यासाठी वारंवार नोटीस सुद्धा दिल्या आहेत. मात्र, काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे आता खदानी सील केल्या जातील.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.

Web Title: The crusher will make six appraisal seals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.