बडनेरा शहरात संचारबंदीचा फज्जा, १३ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:25+5:302021-05-01T04:12:25+5:30
बडनेरा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. यात जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी सूट देण्यात आली. ...
बडनेरा : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. यात जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी सूट देण्यात आली. मात्र, काही दुकानदार, आस्थापनाचे संचालक हे संचारबंदीतही व्यवसाय करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बडनेरा शहरातील १३ दुकानांना सील लावण्यात आले. ही कारवाई महापालिका प्रशासनाने केली असून, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बडनेरा शहरातील नवीवस्तीच्या जयहिंद संकुलातील कृष्णा ट्रेडर्स, दुल्हाणी किराणा, शिव प्रोविजन्स, सुरेश बूट हाऊस, जय बूट हाऊस, वृन्दावन दूध डेअरी, निनावी किराणा दुकान तसेच मौलाना आझाद संकुलातील ज्योती जनरल्स, विशाल इलेक्ट्रिकल्स, सद्गुरु कलेक्शन, राजा प्रोव्हीजन, मनीष जनरल्स, गणेश रेफ्रीशमेंट या आस्थापनांचा समावेश आहे. सचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आस्थापना सील करण्याची कारवाई महापालिका बाजार परवाना विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांचे मार्गदर्शनात निरीक्षक आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, शुभम चोमडे, राहुल वैद्य, मनोज इटनकर, सागर कठोर, अमर सिरवानी, मो.मुतिब यांच्या पथकामार्फत करण्यात आली.