दोन धाब्यांवर संचारबंदी उल्लंघनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:42+5:302021-07-12T04:09:42+5:30

---------------------------------------- फ्रेजरपुरा हद्दीतून कार लंपास अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील आयुर मॉलजवळून चोराने कार लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...

Curfew violation action on two lines | दोन धाब्यांवर संचारबंदी उल्लंघनाची कारवाई

दोन धाब्यांवर संचारबंदी उल्लंघनाची कारवाई

Next

----------------------------------------

फ्रेजरपुरा हद्दीतून कार लंपास

अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीतील आयुर मॉलजवळून चोराने कार लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

अमोल अरुण इंदुरकर (३४, रा. धन्वंतरीनगर, दस्तुरनगर रोड) यांनी एमएच ०६ एबी ७२२५ या क्रमांकाची कार अयुर मॉलजवळील आयुर्वेदिक दवाखान्यासमोर लावली होती. ९ जुलै रोजी रात्री ते पत्नीसह सासुरवाडीत जाण्याकरिता निघाले असता, त्यांना कार दिसली नाही. सगळीकडे कारचा शोध घेतल्यानंतर त्यांनी १० जुलै रोजी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------------------

साईनगरातून दुचाकी लंपास

अमरावती : साईनगर परिसरातून एका इसमाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. सुधीर गुणवंत लखापती (४८, रा. मारोती शोरूमजवळ, बडनेरा रोड) यांनी साईनगरातील एका आईस्क्रीम शॉपवर एमएच २७ बीसी ६७१९ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. आईस्क्रीम घेऊन परतले असता, त्यांना दुचाकी दिसली नाही. सुधीर लखापती यांनी घटनेची तक्रार राजापेठ पोलिसांत नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Curfew violation action on two lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.