कोरोनाकाळात पहिल्यांदाच उघडला पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:11 AM2020-12-29T04:11:06+5:302020-12-29T04:11:06+5:30
अमरावी : अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावती शाखा व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने ...
अमरावी : अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावती शाखा व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने कोरोनाकाळात पहिल्यांदा रंगमंचाचा पडदा उघडला. दोन दिवसांच्या सादरीकरणातून नाट्यरसिकांना पंचतारांकित मेजवानी मिळाली.
‘एक होता बांबू काका’ या नाटकाने २६ डिसेंबरला सकाळी १० वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला. सायंकाळी ६ पर्यंत सादर झालेल्या ‘एक होता बांबू काका’, ‘मातीतील रत्न’, ‘शsssss’, ‘आकांत’ आणि ‘लेखकाचा कुत्रा’ या पाच कलाकृतींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजाभाऊ मोरे, संजीवनी पुरोहित आणि संजय दखणे परीक्षक म्हणून लाभले. स्पर्धेचे उद्घाटन महापौर चेतन गावंडे यांनी केले. उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील,पक्षनेता सुनील काळे आणि माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय उपस्थित होते. प्रारंभी रवि गिरी आणि प्रशांत ठाकरे यांच्या कलाप्रस्थ अकादमीतर्फे नांदी सादर करण्यात आली. प्रास्ताविक शाखाध्यक्ष चंद्रशेखर डोरले यांनी केले. संचालन परीक्षित गणोरकर व मिलिंद जोशी यांनी केले. उपाध्यक्ष प्रशांत देशपांडे, एम.टी. उर्फ नाना देशमुख, विशाल फाटे, श्रद्धा पाटेकर, विराग जाखड, वैभव देशमुख, सुमीत शर्मा, रोहित उपाध्याय, ऋषीकेश भागवतकर, गणेश गंधे, मयूरी काठवे यांनी अथक परिश्रम घेतले.‘क्रांतयोगी गाडगेबाबा’ ही एकांकिका नाना देशमुख आणि तात्या संगेकर यांनी २७ डिसेंबर रोजी सादर केली. स्पर्धेत तब्बल ............. चमूंनी सहभाग नोंदवला. यामध्ये अमरावती, नागपूर, पुणे येथील कलावंत, संस्था सहभागी झाल्या.