खुर्ची जप्त, दवाखान्याला कुलूप
By admin | Published: September 18, 2016 12:21 AM2016-09-18T00:21:39+5:302016-09-18T00:21:39+5:30
परिसरात साथीचे आजार सुरू असतांना स्थानिक प्राथमिक स्वास्थ केंद्रामध्ये खुद्द वैद्यकीय अधिकारीच अनुपस्थित असल्याने शेकडोे रुग्णांना ताटकळत बसावे लागले.
डॉक्टरांवर कारवाईची मागणी : पुसला प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
वरूड/पुसला : परिसरात साथीचे आजार सुरू असतांना स्थानिक प्राथमिक स्वास्थ केंद्रामध्ये खुद्द वैद्यकीय अधिकारीच अनुपस्थित असल्याने शेकडोे रुग्णांना ताटकळत बसावे लागले. या प्रकाराची माहिती मिळताच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीरावसह शेकडो नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केली. दवाखान्याला कुलूप ठोकून आंदोलन केले. अखेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केल्यांनतर आंदोलन मागे घेतले.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अनेक आदिवासी खेड ेआहे. येथे जाण्यायेण्याची वाहतुकीची साधने नसल्याने बहुधा आदिवासी बांधव पायदळ रुग्णालयात उपचाराकरीता येतात. परंतु ाुसला आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपस्थित नसल्याने येथील कर्मचारीच रुग्णांची तपासणी करुन औषधी देत असल्याने अनेकांना चुकीचे उपचार झाल्याचे सांगण्यात येते. पुसला परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त असून येथील प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरुच आहे.
केवळ सकाळच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी केल्यांनतर रान मोकळे असते. वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा आले नसल्याने शेकडो रुग्ण ताटकळत होते. यापूर्वी २९ आॅगष्टला असाच प्रकार धडला. वरिष्ठ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव सहशेकडो नागरिकांनी डॉक्टरांची खुर्ची जप्त केली. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार केला. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी आंदोलजनकर्त्यांची समजूत काढली आणि कुलूप उघडून रुग्ण तपासणी केली. यावेळी १०७ रुग्णांची तपासणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून दिलासा दिला.
यावेळी भाजपोच जिल्हाउपा्ध्यक्ष विजय श्रीराव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांना दुरध्वनीवरुन अतिरीक्त डॉक्टर पाठवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. परंतु केवळ स्वत:चे खासगी रुग्णालय सांभाळून नोकरी करणारे डॉक्टर नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची चर्चा आहे. मुख्यालयी राहत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी सुस्त असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईर् करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजपाचे विजय श्रीराव, विलास पवार, चंद्रशेखर ढोरे, अमित खेरडे, स्वप्निल, मांडळे, विनायक श्रीराव, दीपक काळे, धनराज तडस, अरुण मांडवे, भागवत सोमकुंवर, राजेंद्र काटे, रमेश फरकाडे, सुहास बगाडे, राहुल जिरापुरे, नितीन राउत आदी आंदोलनात सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा आरोग्य अधिकारीच वैद्यकीय अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा नागरीकांचा आरोप !
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने आरोग्याची काळजी घेण्याकरिता अनेक सुविधा दिल्यात. परंतु या सुविधा राबविणारे वैद्यकीय अधिकारीच रुगणंना सेवा देत नसल्याने पुसला परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी, आंदोलने किंवा घेराव घालूनसुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी अशा हलगर्जी डॉक्टरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
अनेकदा तक्रारी करुनही जिल्हा आरोग्य अधिकारी सुस्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. गत महिन्यात कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला असता कारवाईचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु भुतडा यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रुग्णांची हेळसांड सुरुच आहे.
- विजय श्रीराव
उपाध्यक्ष, भाजपा.