सीसीएफ कार्यालयात चौकीदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:11 AM2018-05-01T00:11:39+5:302018-05-01T00:11:39+5:30
कॅम्प स्थित मुख्य वनसरंक्षक कार्यालयातील चौकीदाराने प्रशासकीय अधिकाºयाच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप दुर्गादीन गुप्ता (४०, रा. सरस्वतीनगर) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कॅम्प स्थित मुख्य वनसरंक्षक कार्यालयातील चौकीदाराने प्रशासकीय अधिकाºयाच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दिलीप दुर्गादीन गुप्ता (४०, रा. सरस्वतीनगर) असे मृताचे नाव आहे.
रविवारच्या सुटीमुळे कार्यालय बंद होते. रात्री चौकीदार दिलीप गुप्ता यांची ड्युटी होती. सोमवारी सकाळी एक कर्मचारी कार्यालयात आला असता त्यांना प्रशासकीय अधिकारी डी.एम. सहारे यांच्या कक्षात चौकीदार गुप्ता पडून असल्याचे आढळून आले. सहारे यांच्या कक्षात विषाची दुर्गंधी पसरली होती. या घटनेची माहिती कर्मचाºयाने वरिष्ठ अधिकाºयांना दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि गुप्ता यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विन रुग्णालयात पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
चौकीदाराने आत्महत्या केल्याबाबत गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.
- प्रवीण चव्हाण
मुख्य वनसंरक्षक
वनविभागाच्या कार्यालयातील चौकीदाराने विष प्राशन करून आत्महत्या केली. कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी सुरु आहे.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर