मागील बारा महिन्यांपासून राणी विक्टोरिया, जॉर्ज किंगआसेगाव पोलिसांच्या कस्टडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:18 PM2018-04-04T21:18:14+5:302018-04-04T21:18:14+5:30
अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे एक वर्षापूर्वी आढळलेले चांदीचे शिक्के अजूनही आसेगाव पोलिसांनी अचलपूर कोषागारात जमा केलेले नाहीत
अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे एक वर्षापूर्वी आढळलेले चांदीचे शिक्के अजूनही आसेगाव पोलिसांनी अचलपूर कोषागारात जमा केलेले नाहीत. मिळाल्यापासून अवघ्या पंधरा दिवसांत कोषागारात जमा करण्याचा दंडक असतानाही ती चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलिसांनी वर्षभरापासून स्वत:कडेच ठेवली आहेत.
आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या या चांदीच्या शिक्क्यांमध्ये राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंग यांची भावमुद्रा असलेल्या सिक्क्यांचा समावेश आहे. हेच राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंग या नाण्यांच्या रुपाने मागील बारा महिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत आहेत.
असदपूर येथील कृष्णा म्हाला यांनी आपल्या मालकीचे जुने घर पाडले. या घराच्या मातीच्या ढिगाºयावर खेळत असलेल्या मुलांना चांदीचे पैसे आढळून आले. तेव्हा ३० मार्च २०१७ म्हाला यांनी या मातीत पैशांचा शोध घेतला. मातीत सापडलेली चांदीची १३० नाणी म्हाला यांनी आसेगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. दरम्यान, अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राहोड, ठाणेदार अजय आखरे, इतिहास अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांच्या भेटीदरम्यान चांदीची ८ नाणी परत आढळून आली. तेव्हपासून ही चांदीची १३८ नाणी आढळून आली. तेव्हापासून ही चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलीस ठाण्यात पडून आहेत.
असदपूर येथे सापडलेली चांदीची नाणी ऐतिहासिक मैल्यवान वस्तूत मोडतात. या अशा आढळून आलेल्या मौल्यवाण वस्तू, जिल्हा कोषागार अधिकाºयांची अनुमती घेऊन लगतच्या कोषागारात जमा कराव्या लागतात. पण आसेगाव पोलिसांनी या मौल्यवान वस्तू स्वत:कडेच ठेवल्या आहेत.
कोट
मौल्यवान वस्तुंमध्ये ही नाणी मोडतात. मौल्यवान वस्तू मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हा कोषागार अधिकाºयांची परवानगी घेऊन अचलपूर कोषागारात ती नाणी ठाणेदारांनी जमा करायला हवी होती.
- भूपेंद्र खरपीकर, कोषागार अधिकारी, अचलपूर
यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा कोषागार 'त्या' चांदीच्या नाणी ठेवण्याची व्यवस्था नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला कळविले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही.
- अजय आखरे, ठाणेदार, आसेगाव पोलीस ठाणे