ग्रामरोजगार सेवकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 09:58 PM2017-09-14T21:58:01+5:302017-09-14T21:58:31+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करू न शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करू न शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
ग्रामरोजगार सेवक कर्मचाºयांच्या मागण्यामध्ये ग्रामसेवकाला मासिक वेतन लागू करावे, ग्रामरोजगार सेवकांना नियमित करू न त्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, व अमरावतीसह राज्यभरातील ग्रामरोजगार सेवकांचे शासन व प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे. दरम्यान संघटेनच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना विविध मागण्याचे निवेदन सोपवून मागण्यांकडे त्याचे लक्ष वेधले. यासंदर्भात योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्रावण बोकडे व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.