'केबल वॉर'मुळे ग्राहकांनाच मन:स्ताप

By admin | Published: March 29, 2016 12:15 AM2016-03-29T00:15:44+5:302016-03-29T00:15:44+5:30

विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत.

Customers' mind wary of 'Cable War' | 'केबल वॉर'मुळे ग्राहकांनाच मन:स्ताप

'केबल वॉर'मुळे ग्राहकांनाच मन:स्ताप

Next

एकमेकांचे केबल तोडले : क्रिकेट सामन्याच्या दिवशीच प्रक्षेपण बंद
अमरावती : विविध केबल कंपन्यांचे जाळे शहरात पसरल्याने आता स्पर्धा करण्यासाठी एकमेकांची केबल तोडण्याचा प्रताप काही केबल आॅपरेटर करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलियात झालेल्या सामन्यादरम्यान शहरात केबल वॉरचा प्रकार उघड झाला असून केबल प्रक्षेपण बंद झाल्याने ग्राहकांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरात केबल व्यवसाय करणाऱ्या तीन कंपन्या विविध परिसरात केबलचे जाळे पसरवीत आहेत. प्रत्येक परिसरात तिन्ही कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचे काम करीत असून एकमेकांचे केबल तोडून टीव्हीवरील प्रक्षेपण बंद करण्याचे प्रकार करीत आहेत. रविवारी भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मॅच दरम्यान शहरातील तब्बल १०० ते १२० ठिकाणी केबल तोडण्यात आल्याने खळबळ उडाली. केबल तोडल्यामुळे शहरातील बहुतांश केबल ग्राहकांच्या घरचे टीव्ही संच अचानक बंद पडले. केबल अचानक बंद झाल्यामुळे केबल आॅपरेटरांनी फॉल्ट शोधण्याची धावपळ सुरू केली. यामध्ये काही जणांचा रंगेहातसुध्दा पकडले आहे. मात्र, हा प्रकारावरून वादविवाद सुध्दा झाले. त्यामुळे केबल वॉरमुळे हाणामारीचे प्रकारसुध्दा तसेच विरुद्ध कंपनीचे कर्मचारी हल्लेसुध्दा करीत असल्याची ओरड केबल चालकांची आहे. रविवारी राजकमल उड्डान पुल्यावरून गेलेले केबल तोडण्यात आले होते. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावरील बहुतांश केबल प्रक्षेपण बंद झाले होते. केबल बंदचा सर्वाधिक फटका ग्राहकांनाच सहन करावा लागत असल्याचे आढळले.यासंदर्भात केबल चालकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रारीसुध्दा नोंदविल्यात. हे केबल वॉर असेच सुरू राहिल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बच्चू कडू पोहोचले सीपींच्या दालनात
शहरातील केबल वॉरची स्थिती पाहता एका कंपनीच्या केबलचालकाने आमदार बच्चू कडू यांच्याकडे धाव घेतली. त्यांची रास्त बाजू ऐकून आ.बच्चू कडू यांनी तत्काळ दखल घेत रविवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. त्यांच्या समक्ष केबल तोडण्याचा प्रकार त्यांनी सांगितला. यासंदर्भात पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी आ.कडू यांना दिले आहे.

३१ मार्चला अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होणार
शासनाने सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी ३१ डिसेंबर डेडलाईन दिली होती. त्याच दिवशी अ‍ॅनालॉग सिग्नल बंद करण्यात आले होते. मात्र, अंतिम तारखेपर्यंत बहूतांश केबल आॅपेरटरांनी ग्राहकांच्या घरी सेटटॉप बसविले नव्हते. त्यामुळे काही केबल चालकाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार अ‍ॅनालॉग सिग्नल सुरु ठेवण्याला मुदतवाढ मिळाली होती. आता ती मुदत ३१ मार्च रोजी संपणार असून अ‍ॅनालॉग सिग्नल बंद होण्याची शक्यता आहे.

शहरातील काही ठिकाणी केबल तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबद्दल उपायुक्तांकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्यासंदर्भाने आ.बच्चू कडू हे भेटायला आले होते. याप्रकाराची पोलीस उपायुक्तांमार्फत चौकशी करून लवकरच तोडगा काढू.
- दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त.

Web Title: Customers' mind wary of 'Cable War'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.