फेसबुकवर अश्लील साहित्य टाकणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

By admin | Published: January 16, 2016 12:26 AM2016-01-16T00:26:25+5:302016-01-16T00:26:25+5:30

लोणा-टाकळी येथील एका विद्यार्थिनीच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून त्याचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी

Cyber ​​cell's eyes are being put on pornography on Facebook | फेसबुकवर अश्लील साहित्य टाकणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

फेसबुकवर अश्लील साहित्य टाकणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

Next

मॅसेजेस टाकणारे आऊ ट आॅफ स्टेट : आरोपीला न्यायालयीन कोठडी
संदीप मानकर अमरावती
लोणा-टाकळी येथील एका विद्यार्थिनीच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करून त्याचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिच्या फेसबुकवरील अकाऊंटवर अश्लिल साहित्य पोस्ट करणारे व मॅसेजेस टाकणारे मात्र आऊ ट आॅफ स्टेट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अश्लील साहित्य पोस्ट करणाऱ्यांचा शोध मात्र अमरावती ग्रामीण सायबर सेलची पोलीस घेणार आहे.
लोणी येथील आरोपी सचिन गायगोले याने चार महिन्यांपूर्वी येथीलच एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या नावे फेसबुकवर अकाऊंट तयार केले होते. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 'फ्रेन्ड्स रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट' केल्या होत्या. त्यामुळे अनोळखमी मित्रांनी यावर अश्लील साहित्य पोस्ट केले होते.
हे जेव्हा त्या विद्यार्थिनीच्या मैत्रिणींकडून तिला माहीत झाले तेव्हा समाजात तिची बदनामी झाली होती. तिने कॉलेजमध्ये जाणेसुध्दा सोडले होते.
आई-वडिलांनी लक्ष द्यावे
सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. जे अल्पवयीन मुलं-मुली आहेत. त्यांची मॅच्युरिटी कमी असते. त्यांना समज नसते ते व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकचा वापर करताना आमिषाला बळी पडतात. आई-वडिलांनी विद्यार्थ्यांशी, सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात संवाद साधला पाहिजे. फेसबुक व सोशल मीडियाच्या वापराबाबत पोलिसांच्यावतीनेसुध्दा शाळा, महाविद्यालयात अवेअरनेस येण्याच्या दृष्टिकोनातून प्रोग्राम राबविण्यात आले आहेत. जर सोशल मीडिया नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून मुलींचे शोषण करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर अशा मुलींनी पुढे यावे. त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, त्यांना पोलिसांची मदत होईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांनी दिली.

Web Title: Cyber ​​cell's eyes are being put on pornography on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.