चांदूर रेल्वे तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा; ६३ घरांवरील टीनपत्रे उडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 01:23 PM2023-06-12T13:23:40+5:302023-06-12T13:24:16+5:30
येरड, खरबी, एकलारा परिसरात मोठे नुकसान
चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील येरड, खरबी, एकलारा परिसराला शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह धुवाॅंधार पावसाचा तडाखा बसला. यात येरड, खरबी, एकलारा गावांतील विद्युत खांब वाकले, वीजवाहिन्या व झाडे तुटून रस्त्यावर पडली, तर अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाले. येरड येथील जवळपास ६३ घरांवरील टीनपत्रे उडाल्याने घरातील धान्य, साहित्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. येरड येथील मनोहर डगवार यांचे दोन बैल व एक वासरू जखमी झाले.
येरड येथील गजानन देशमुख यांच्या घराचे टीनपत्रे उडाल्याने तेथे ठेवलेले प्रतीक देशमुख यांचे सोयाबीन व हरभऱ्याचे २३० कट्टे भिजले. ज्ञानेश्वर एकोनकार, इंदू विलास हसतबांधे, बंडू हसतबांधे, श्रावण उईके यांच्या घरावरील टीनपत्रे पूर्णत: उडाले, तर श्यामराव तोडासे, जया शंकर ठाकरे, सुधाकर कुमरे, सुधाकर मडावी, पुनाबई उईके, सदाशिव भोयर, सीता एकोनकार, अरुण गुजर, नारायण मानकर, भास्कर मेश्राम, नारायण डगवार, अर्जुन कन्नाके, शोभा इंगोले, गोविंद हसतबांधे, महागुजी वरकडे, शोभा खंडाते, गजानन गवई, सुरेश चौधरी, विमल धोका, विजय देशमुख, रेखा हसतबांधे, आशा रामदास ठाकूर, प्रकाश देशमुख, कांतेश्वर देशमुख, दादासाहेब देशमुख, श्रीकृष्ण मडावी, विष्णूप्रसाद शर्मा, महेंद्र देशमुख, सुभाष देशमुख, दिवाकर मरस्कोल्हे, संजय उईके, सुभाष मडावी, हरिदास मारबदे, सुधाकर भजगवरे, मुरलीधर मडावी, चंद्रशेखर खोडके, मधुकर मडगे, विनोद खोडके, कृष्णराव मडावी, सुधाकर उईके, अण्णाजी उईके, सुरेश नानवटकर, खुशाल देशपांडे, चंद्रभान श्यामकुवर, लक्ष्मण मडावी, राजकुमार बडवाईक, पंजाब वरकडे, रामभाऊ शामकुवर, शंकर मानकर, निर्मला मडगे, नरेंद्र डेहनीकर, मंदा निखाडे, मधुकर मडावी, दिलीप जिवणे यांची घरे तसेच आरोग्य उपकेंद्रातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चक्रीवादळामुळे येरड, खरबी, एकलारा व झिबला गावांतील ग्रामस्थ चांगलेच हादरले होते. येरड परिसरातील विद्युत पुरवठा १८ तास खंडित होता. अजूनही अर्ध्या गावाचा विद्युत पुरवठा खंडित असून, दुरुस्तीचे काम महावितरणकडून सुरू होते.
माजी आमदारांची भेट
माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी येरड गावाला भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी डॉ. सतीश देशमुख, नीलेश देशमुख, राजू नेरकर, देवेंद्र देशमुख, कृष्णा देशमुख, अक्षय देशमुख, प्रकाश देशमुख, मनोहर मारबदे, श्रीकृष्ण शिणगारे आदी उपस्थित होते.
खरबी मांडवगड येथील १९ घरांचे अंशतः नुकसान
चांदूर रेल्वे तालुक्यातील खरबी मांडवगड येथील १९ घरांचे अंशतः नुकसान झाले. परिसरातील मौजा झिबला शिवारातील कपिल देशमुख यांच्या शेतातील लिंबाची ३५ झाडे पडली.