बेलोरा येथील महामार्गावर सिलिंडरचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:43 AM2019-06-26T01:43:09+5:302019-06-26T01:43:31+5:30

धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

Cylinder truck overturned on the highway in Belora | बेलोरा येथील महामार्गावर सिलिंडरचा ट्रक उलटला

बेलोरा येथील महामार्गावर सिलिंडरचा ट्रक उलटला

Next
ठळक मुद्देएकच खळबळ : वाहतुकीचा खोळंबा

बडनेरा : धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे बडनेरा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
इंडेन कंपनीच्या गॅस सिलिंडरने भरलेला एमएच४९-१०९२ या क्रमांकाचा ट्रक धनज येथून नांदगाव खंडेश्वरकडे दुरुस्तीच्या कामी जात होता.
दरम्यान, ट्रक बेलोरा विमानतळाजवळील वळण मार्गावर असंतुलित होऊन उलटला. या घटनेच्या माहितीवरून बेलोरावासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. सिलिंडर भरले असल्याची शंका नागरिकांना आली होती; मात्र ते रिकामे असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चालकाच्या चुकीने ट्रक उलटला असून, याबाबत चौकशी लोणी पोलीसांनी करावी, अशी नागरिकांची मागणी होती. हा ट्रक बाळू कांबळे नामक चालक चालवीत होता. ट्रक उलटला तेव्हा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यामुळे चालकांचा खोळंबा झाला.
ट्रक उलटण्याच्या घटना वाढल्या
अकोला महामार्गावरील वाय पॉइंटवरदेखील सिलिंडरने भरलेला ट्रक काही महिन्यांपूर्वी उलटला होता. त्यातील सिलेंडर रस्त्यावर व नाल्यात पडले होते. अपघाताच्या वेळी सुदैवाने वेग कमी होता. आता बेलोरा विमानतळाच्या वळणावरील घटना चालकाच्या किंवा सिलिंडरची क्षमता व इतर बाबींमुळे या घटना घडत आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा नाहक मोठ्या स्फोटाला सामोरे जावे लागणार, हेच या घटनांवरून दिसून पडत आहे.
 

Web Title: Cylinder truck overturned on the highway in Belora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात