अब तो पापा नही रहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:11 AM2021-05-15T04:11:34+5:302021-05-15T04:11:34+5:30
पान २ ची बॉटम मेळघाटातील वनरक्षकाचा कोरोनाने मृत्यू : आघात अनिल कडू परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत जारिदा ...
पान २ ची बॉटम
मेळघाटातील वनरक्षकाचा कोरोनाने मृत्यू : आघात
अनिल कडू
परतवाडा : मेळघाट प्रादेशिक वनविभागांतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील सलीता बिटमध्ये कार्यरत वनरक्षक नामदेव बेठे (रा. टेम्ब्रुसोंडा) यांची अमरावती येथे उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात १३ मे रोजी प्राणज्योत मालवली. दरम्यान, लसीकरणाला माहिती बेठे यांना देण्यासाठी एका सहकाऱ्याने बेठे यांच्या मुलाला कॉल केला. त्यावर बेठे यांच्या मुलाने ‘अब तो पापा नही रहे’ असे जड अंत:करणाने सागितले. त्यावेळी भेसूर शांतता पसरली.
नामदेव बेठे यांना सलीता येथील मुख्यालयी असतानाच अस्वस्थ वाटू लागले. यात त्यांना अंगदुखी, डोकेदुखीने ग्रासले. तोंडाला चवही नव्हती. मुख्यालयी शासकीय निवासस्थानी ते वास्तव्यास असतानाच वनपाल महादेव बेलकर कामानिमित्त सलीता येथे पोहोचले. तेव्हा बेठे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे बेलकर यांना सांगितले.
तब्येत आणि लक्षणे बघता, वनपाल बेलकर यांनी बेठे यांना तात्काळ औषधोपचार करून घेण्यास सुचविले. बेठे ९ मे रोजी टेम्ब्रूसोंडा येथे पोचलेत. तेथे औषधोपचार घेतले. यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांना अमरावती येथील कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले. दरम्यान १३ मे रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
बॉक्स
वनकर्मचाऱ्यांना धक्का
१३ मे रोजी चुरणी येथे वन कर्मचाऱ्यांकरिता लसीकरणाचा कॅम्प ठेवला गेला. त्यानुसार क्षेत्रीय वनकर्मचारी लस घेण्याकरिता कॅम्पवर पोहोचले. या लसीकरणाची माहिती वनरक्षक बेठे यांना द्यावी आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करावी म्हणून वनपाल महादेव बेलकर यांनी बेठे यांच्या मुलाला फोन लावला तेव्हा त्याने वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. यावेळी सर्वांनाच धक्का बसला.