डेग्यू, मलेरिया साथरोगावर उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:45+5:302021-09-03T04:12:45+5:30
अमरावती : शहरात डेंग्यू, मलेरिया व अन्य साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. साचलेले पाण्याचे डबके, नाल्यांमध्ये तुंबलेला कचरा अशा विविध ...
अमरावती : शहरात डेंग्यू, मलेरिया व अन्य साथरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. साचलेले पाण्याचे डबके, नाल्यांमध्ये तुंबलेला कचरा अशा विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक घरात
साथरोगाचे रूग्ण ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे त्वरेने डेग्यू, मलेरिया साथरोगावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बसपाचे गटनेता चेतन पवार यांनी केली आहे. आयुक्त प्रशांत राेडे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
हल्ली खासगी व शासकीय रूग़्णालये रूग्णांनी तुडूंब भरले आहेत. उपचाराकरिता बेड मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे प्रशासनाने डेग्यू, मलेरिया साथरोगावर तातडीने उपाययोजना करुन सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी चेतन पवार यांनी केली आहे. महापालिका दवाखान्यात रेबीज ईजेक्शन नाही, अन्य औषधांची वानवा आहे. बडनेरा येथील मोदी दवाखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. गरीब, सामान्य रूग्णांना उपचार मिळावा, अशी मागणी बसपाने केली आहे. यावेळी बसपा गटनेता चेतन पवार, नगरसेविका ईशरत बानो, रामभाऊ पाटील, आदी उपस्थित होते.