समाजकल्याण समिती सभेला विस्तार अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 10:47 PM2018-12-21T22:47:09+5:302018-12-21T22:47:23+5:30
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती सुशीला कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला १४ पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी हजर नसल्याने सदस्य शरद मोहोड, गजानन राठोड व इतर सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरहजर अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ बजावण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती सुशीला कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला १४ पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी हजर नसल्याने सदस्य शरद मोहोड, गजानन राठोड व इतर सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरहजर अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ बजावण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले.
सभेत जि.प. २० टक्के सेस फंड निधी योजना, अनुसूचित जाती व मागास घटकांच्या वस्तीच्या कामाचा बृहत आराखडा, तीन टक्के दिव्यांग निधी, जि.प. सेस, ३ टक्के व ५ टक्के निधी खर्चाचा आढावा आदी मुद्दे पटलावर होते. मात्र, सभेच्या प्रारंभीच विस्तार अधिकारी हजर नसल्याने प्रश्नांचे उत्तर कोण देणार, असा सवाल शरद मोहोड, गजानन राठोड, सुनंदा काकड, अनिता अडमाते, सीमा सोरगे, रंजना गवई व पंचायत समिती सभापती अर्चना वेरूळकर आदींनी समाजकल्याण अधिकाºयांना केला. त्यांनी माहिती घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. याच मुद्द्यावर सभा स्थगित करण्यात आली.
सभेला समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, निरीक्षक डी.जे. देशमुख, केशव बिजवे, शुभदा अढाऊ, सावन गवई, नरेंद्र दाभाडे, मेश्राम आदी अधिकारी उपस्थित होते.
विस्तार अधिकारी हजर नसल्यामुळे सभा स्थगित केली. पुढील सभेला त्यांना उपस्थित राहण्याबाबत सीईओ, अॅडिशनल सीईओ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
- प्रशांत थोरात
समाजकल्याण अधिकारी
विस्तार अधिकारी यांचे विविध मागण्यांसाठी सभा व अहवाल बंद आंदोलन सुरू आहे. याबाबत सीईओंना कळविले आहे. समाजकल्याणची कामे येत नसली तरी ही जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत.
- एस.एम. उमक
विभागीय संघटक
विस्तार अधिकारी संघटना