गावाच्या मध्यभागी लावली दालमिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:12+5:302021-04-14T04:12:12+5:30
ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतला प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार केल्या. दालमिल गावापासून दूर नेण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. मात्र, ...
ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामपंचायतला प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार केल्या. दालमिल गावापासून दूर नेण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. मात्र, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने नागरिकांनीच पंचायत समितीकडे धाव घेतली. येत्या पंधरा दिवसांत तक्रारारीवर विचार न केल्यास, अंजनवती नागरिक उपोषण करतील, असा इशारा उपसरपंच गजानन उंदरे, ग्रामपंचायत सदस्य शूद्रमती गोरडे, रेश्मा कराळे, उमेश गावंडे, नंदकिशोर गोरडे, दीपक गावंडे आदींनी दिला.
-------------
अंजनगाव रायुकाँचे रक्तदान शिबिर
अंजनगाव सुर्जी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस अंजनगाव शहर व राष्ट्रवादी काँग्रेस शहर यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ‘ब्लड फॉर महाराष्ट्र’ अभियानांतर्गत ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुशील गावंडे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अमरदीप कुकडे यांनी केले. परतवाडा येथील रक्तपेढीच्या चमूने रक्तसंकलन केले. यावेळी सप्तखंजिरी वादक संदीपपाल महाराज, प्रदीप येवले, सागर साबळे, अफसर बेग, फहीम, स्मिता लहाने, साधना कोकाटे, नीलिमा कडू, मीना कोल्हे, स्मिता घोगरे, शुभम मेश्राम, किरण इंगळे, नितीन गावंडे, गजानन जाऊळकर, साहिल सोलीव, निखिल वडूरकर, सचिन निर्मळ, धीरज निंभोरकर, अजित काळबांडे, इरफान शेख, माधव राऊत, राहुल टांक, सागर येवले, विश्वजित मेतकर, मंगेश पेढेकर, सत्यम काळे, माधव राऊत, सुमीत गवळी, शिवा काळे, अमोल बोंद्रे, नागेश भांबूरकर, विशाल काळपांडे, जगदीश गोबरे, खालिद सलीम, मो. सलीम, शेख जुबेर, रामेश्वर सरकटे, अब्दुल सलीम, इरफान शेख, सत्यम काळे आदी उपस्थित होते.