वरुड येथे विदर्भ आंदोलन समितीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:30 AM2020-12-11T04:30:39+5:302020-12-11T04:30:39+5:30

कोरोना काळातील वीजबिल माफ करा : महाआघाडी सरकारविरोधात निदर्शने वरूड : कोरोनाकाळातील वीज बिल सरकारने भरावे तसेच २०० ...

Dam of Vidarbha Andolan Samiti at Warud | वरुड येथे विदर्भ आंदोलन समितीचे धरणे

वरुड येथे विदर्भ आंदोलन समितीचे धरणे

googlenewsNext

कोरोना काळातील वीजबिल माफ करा : महाआघाडी सरकारविरोधात निदर्शने

वरूड : कोरोनाकाळातील वीज बिल सरकारने भरावे तसेच २०० युनिटपर्यंतचे बिल माफ करावे, या मागणीकरिता विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने ७ डिसेंबर रोजी स्थानिक महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसताना वीज बिलात वाढ झाली. सर्वसामान्य नागरिकांना ही वाढ परवडणारी नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये ६५ मिमि पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही धरणे आंदोलनात मांडण्यात आली. यावेळी संयोजक दिलीप भोयर , शिवहरी सावरकर , युवराज कराळे, सुनील पावडे, हरीश आजनकर, ताराबाई बारस्कर, नीलकंठ यावलकर, जनार्दन काळे, रघुनाथ खुजे, जयंत कोहळेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

चांदूर रेल्वेतही ठिय्या

चांदूर रेल्वे : लॉकडॉऊनमधील वीज बिल माफ करा, यांसह विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने स्थानिक तहसील कार्यालयासमोर सोमवारी सुरेंद्र खेरडे व अशोक हांडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. विजेचा स्थिर आकार कमी करा, विदर्भातील तरुणांना प्राधान्याने नोकरी द्यावी, युनिटचा दर कमी करावा आदी मागण्यांचा त्यात समावेश होता. या आंदोलनात संजय पवार, मनोहर देशमुख, राजीव अंबापुरे, सुधाकर थेटे, पुरुषोत्तम मारोटकर, अरुण शेळके, विनोद वाघ, सुशील कचवे, दिनेश जगताप आदी नागरिक उपस्थित होते.

--------------------------------------------------------

Web Title: Dam of Vidarbha Andolan Samiti at Warud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.