पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:33+5:302021-07-14T04:15:33+5:30

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भाच्या १४ तालुक्यांमधील ३२८ ...

Damage to 21,199 hectares due to heavy rains in West Vidarbha | पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे २१,१९९ हेक्टरमध्ये नुकसान

Next

अमरावती : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर १० ते १२ जुलैच्या दरम्यान झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भाच्या १४ तालुक्यांमधील ३२८ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर येवून २१ हजार १९९ हेक्टरमधील पिके बाधित झालेली आहे. यामध्ये भिंत पडून एकाचा मृत्यू झाला, याशिवाय ४१२ घरांची पडझड झालेली आहे.

विभागात अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात पावसाने नुकसान झाले व वरशिम, बुलडाण्यात स्थिती निरंक आहे. बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, कोठा, जोडमोहा, दारव्हा, चिखली, मांगकिन्ही, बोरी, लालखेड, महागाव, तिवरी, कलगाव, आर्णी, जवळा, लोणबेहळ, अंजनखेड, गणेशपूर, शिबला, पाटनबोरी व मालखेड मंडळांमधील १२० गावांमध्ये पावसाने नुकसान झालेले आहे. यामध्ये २८० घरांचे अंशत: नुकसान झाले. ७,९४३ हेक्टर पिकांखालील क्षेत्र खरडल्या गेलेले आहे. याशिवाय १२ जुलैच्या पावसाने नेर तालुक्यातील मालखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने ८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील १५ गावांमध्ये ६ घरे व २५ हेक्टरमधील पिके, अकोट तालुक्यातील १२ गावांमध्ये एका घराचे नुकसान व ११० हेक्टरमधील पिके, तेल्हारा तालुक्यात ३ गावांध्ये तीन घरे, बाळापूर तालुक्यातील कासारखेडमध्ये ९ वर्षांच्या बालकाचा भिंत कोसळून व बटवाडी येथे एका बैलाचा वीज पडून मृत्यू झालेला आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात १६६ गावे बाधित

अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झाले. जिल्ह्यातील १६६ गावे बाधित झाली. यामध्ये दर्यापूर तालुक्यात ११५ घरांचे अंशत: नुकसान झाले तर १२,६६० हेक्टरमधील पिके खरडून गेली. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १२ गावे बाधित झाली व सात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. ७४ हेक्टरमधील पिके खरडून गेली व ३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

Web Title: Damage to 21,199 hectares due to heavy rains in West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.