समृद्धी महामार्गामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 06:00 AM2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:43+5:30
तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाढोणा रामनाथ : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामात आजूबाजूच्या शेतजमिनीजवळील रपटे, धुरे, नाल्या नष्ट झाले. पावसाने थैमान घातल्याने जमिनीतील संपूर्ण माती पिकांसह वाहून गेली. यामुळे लोहगाव, पिंपळगाव आणि खेड शिवारात पिकांचे आणि शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. तीनही गावांतील शेतकरी सोमवारपासून महामार्गावरच उपोषण करीत आहेत.
तीनही गावांतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतात येऊन पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदारांच्या आदेशावरून पंचनामे होऊन शेतकऱ्यांना एक हजार ते पाच हजारांचे धनादेश मिळाले. ते धनादेश शेतकऱ्यांनी शासनाकडे परत केले. राजेंद्र चौधरी यांच्या सुमारे दोन एकर शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली. परंतु, एक रूपयाही मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. राजेश सानप, संतोष कांबळे, संतोष शेळके, लता शेळके, किसनराव राऊत, ज्ञानेश्वर राऊत, कमलाबाई फड, नितीन तट्टे, आनंदा बन्सोड, बादल इंगळे, रामजीवन बोबडे, सुनील काळे, प्रमोद सानप, प्रवीण चौधरी, अरविंद फड, उत्तमराव काळे, रामभाऊ वैद्य, अमित बन्सोड आदी शेतकरी उपोषण करीत आहेत.
शासननिर्णयानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला होता. परंतु, तो त्यांना मान्य नाही. दोन वेळा सर्वेक्षण झाले; परंतु शेतकरी मागणीवर कायम आहेत.
- गजानन पळसकर, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ