वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: June 18, 2017 12:13 AM2017-06-18T00:13:02+5:302017-06-18T00:13:02+5:30
मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत मोठे नुकसान झाले आहे. शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत.
मोर्शीत कहर : डाळिंबाची झाडे उन्मळून पडली, घरांचे छप्पर उडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत मोठे नुकसान झाले आहे. शेतातील झाडे उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घरावरील छत उडाल्याने ते उघड्यावर आले आहेत.
कळमापूर, तुळजापूर, कवठाळ व भांबोरा येथील घरांचे टीन अन् घरे खाली शेतातील डाळींबाची झाडे उन्मळून पडल्यान लाखो रुपयांचे नुकसान झाले. कवठा येथील शिवदत्त कडू, श्रीकृष्ण आठवले यांच्या घराचे छप्पर उडाले. चक्रधर पाथरे यांच्या घराची भिंत पडल्याने गाईचा जीव गेला. कमळापूर येथील पाच घरे क्षतीग्रस्त झाली. किसनराव उमक, देवीदास आमले, बाबाराव खंडारे, रमेश सोमवंशी, प्रमिला आठवले, मंगेश भेंडे यांचेही नुकसान झाले.
कुऱ्ह्यात संत्रा उत्पादकांचे नुकसान : शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कुऱ्हा व वागदा परिसरात संत्रा बागाईतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्तम दारोकर, गजानन दारोकर, नीलेश दारोकर, प्रमोद दारोकर, विनोद दारोकर, आनंद पोकळे, आनंद शिंगणे, राजू नवघरे, नीळकंठ पोफळे, किसन तेटू, रणजित सपाटे या संत्रा बागाईतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.