पालापाचोळ्याच्या आगीत हिरवेगार वृक्षांचे नुकसान
By admin | Published: March 28, 2016 12:04 AM2016-03-28T00:04:03+5:302016-03-28T00:04:03+5:30
शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे.
अमानुषपणे कत्तल : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
अमरावती : शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे. या मध्ये चांगली वृक्षसुध्दा जळून खाक होत आहे. परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दर्यापूर - अमरावती मार्गावर असेच रोज शेताशेजारील धुऱ्यावरील वाढलेले गवत व पाला पेटविण्यात येत आहे.
या मार्गावर वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष लावली आहेत. काही झाडे मोठी झाली तर काही वृक्ष लहान आहेत. आगीमुळे झाडांचे बुंदे जळतात. यामुळे अनेक झाडे नष्ट होत आहेत. काही ठिकाणी उन्हळयात झाडांना आगी लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. झाडांना आगी लावल्या जातात त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नंतर अर्धवट जळालेले खोड नाट्यमयरीत्या कापून नेण्यात येते हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळतो. मात्र या गंभीर प्रश्नांची फारशी दखल घेण्यात येत नाही. शासन वृक्ष लावण्यावर लाखो रुपये खर्च करते व रस्त्याच्या दोन्ही कळेला वृक्ष लावते व त्याचे संवर्धन करते मात्र झाडी मोठी झाल्यानंतर त्याची अमानुषपणे कत्तल करण्यात येत आहे. वृक्षतोड क रणाऱ्या टोळयांनी नविन फंडे वापरणे सुरू केला आहे. रात्री झाडांच्या बुंद्यांना आगी लावायच्या, असा धंदा सुरू आहे. त्यांमुळे काय करतात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे अधिकारी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. जिल्हाभर असा प्रकार सर्वच तालूकयात होताना आढळत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवरची झाडे सुध्दा अश्याच प्रकारे जाळण्यात येतात रविवारीसुध्दा अशा प्रकारे दर्यापूर-अमरावती मार्गावर पालापाचोळा पेटवून रस्त्यालगतची वृक्ष जाळण्यात आली आहे. (प्रतिनिधी)