तळेगाव शेतशिवारात सोलार पॅनलचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:57+5:302021-05-31T04:10:57+5:30
तळेगाव दशासर : स्थानिक गावात अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने घरावरील टीनपत्रे उडाले. झाडे कोलमडून पडली, तसेच इतरही मोठे नुकसान ...
तळेगाव दशासर : स्थानिक गावात अचानक सोसाट्याचा वारा सुटल्याने घरावरील टीनपत्रे उडाले. झाडे कोलमडून पडली, तसेच इतरही मोठे नुकसान झाले. यामध्ये शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
यामध्ये फळबाग, भाजीपाला, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच येथील शेतकरी वासुदेवराव चौधरी यांच्या शेतात कृषी पंपासाठी लावलेल्या सौर ऊर्जा पॅनलवरील प्लेटस् उडून गेल्या. त्यामुळे शेतात मागील वर्षी लावण्यात आलेल्या आंबा, सीताफळ, लिंबू, करवंद यासारख्या अनेक प्रजातींच्या झाडाच्या कलमा लावल्या असल्याने झाडांना पाणी कसे द्यावे, ही चिंता सतावत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून कृषीपंपासाठी लावण्यात आलेल्या सौर ऊर्जा पॅनलवरील प्लेट उडाल्याने नुकसानभरपाई किंवा नवीन सोलार पंप बसविण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी वासुदेवराव चौधरी यांनी केली आहे.