अंबादेवी मंदिरासमोरील भिंतीची मनसेकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:14 AM2017-07-20T00:14:53+5:302017-07-20T00:14:53+5:30
अंबादेवी मंदिरासमोरील सुरक्षा भिंतीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.
व्यापाऱ्यांचाही सहभाग : कोतवाली ठाण्यात गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंबादेवी मंदिरासमोरील सुरक्षा भिंतीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. यासंदर्भात संस्थान कर्मचाऱ्याकडून कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.पोलिसांनी मनसेचे संतोष बद्रेसह चार ते पाच कार्यकर्ते व चार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
अंबादेवी मंदिरासमोरच सरंक्षण भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे व्यापाऱ्यांकडील ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे. या कारणास्तव व्यापाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. या समस्येचे निरासन करण्यासाठी संस्थान विश्वसांना व्यापाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन बुधवारी मंदिरासमोरील भिंत तोडण्याचे काम सुरू केले. संतोष बद्रेसह प्रवीण डांगे, संजय गव्हाळे यांच्यासह आदी कार्यकर्ते भिंत तोडत असल्याचे मंदिरातील कर्मचाऱ्यांना माहिती होताच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना थांबविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान धक्काबुक्की सुध्दा झाली. घटनेच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी पाचारण करून मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्याविरुद्ध भादंविच्या कलम १४३, ४२७, १३५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.