संत्र्याला पवारांनीच केले शापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:14 PM2019-01-20T23:14:37+5:302019-01-20T23:14:58+5:30

विदर्भातील संत्रामध्ये एक प्रकारचे अ‍ॅसिड असल्याचे शरद पवार बोलले अन् तेव्हापासून संत्र्यांचे मार्केट कोलमडले. बीयात अ‍ॅसिड आहे हे मान्य. पण, संत्रा खायला गोड आहे. मात्र, विदर्भात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला शरद पवारांनी शापित केले.

The damsel was cursed by the husband only | संत्र्याला पवारांनीच केले शापित

संत्र्याला पवारांनीच केले शापित

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन अघाडीच्या महासभेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भातील संत्रामध्ये एक प्रकारचे अ‍ॅसिड असल्याचे शरद पवार बोलले अन् तेव्हापासून संत्र्यांचे मार्केट कोलमडले. बीयात अ‍ॅसिड आहे हे मान्य. पण, संत्रा खायला गोड आहे. मात्र, विदर्भात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला शरद पवारांनी शापित केले. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी विदर्भातील सगळे मार्केट संपविले, असा आरोप भारिप-बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला.
स्थानिक सायन्सकोर मैदानावर रविवारी वंचित बहुजन आघाडीची सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एमआयएमचे आ. वारीस खॉ पठाण, भारीप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, माजी मंत्री दशरथ भांडे, सरचिटणीस गुणवंत देवपारे, युसूफ पिजांनी, सागर डबरासे, नदीम सिद्दीकी, बालमुकूंद भिरडी, नंदेश अंबाडकर, निकोसे, डी.एच मेश्राम, विद्या वानखडे, सलाउद्दीन, राजेंद्र महाडोळे, मो. नजीम, संध्या वाघोडे, वंदना तायडे, विपीन अलोकार, कॅप्टन खंडारे, नंदू सहारे, श्रद्धा चव्हाण, संतोष रहाटे आदी उपस्थित होते.
संस्कृतीच्या ठेकेदारांचे अधिवेशन बडनेरा येथे सुरू आहे. कुठल्या संस्कृतीचे ठेकेदार आहात? ते तर पहिले सांगा. बहुजन ब्रिटीशांशी लढला हा त्यांचा गुन्हा. मात्र, संस्कृतीचे ठेकेदार तेव्हा ब्रिटिशांच्या मांडीवर बसले. त्यांना मदत केली आणि आज आपल्याला शहानपणा शिकवायला लागले. कोण राष्ट्रवादी अन् कोण राष्ट्रद्रोही. आता यांना आम्ही विचारतो येथील तेली, माळी, धनगर, पारधी अशा किती जनांना तिकीट देणार आहात. आम्ही सत्तेवर आल्यास मनुला हद्दपार करू. मनुचे पालन करणारे मानवतेच्या विरोधात आहे. कायद्याच्या विरोधात बोलला तर मोका लावू, बंड करण्याची भाषा बोललात तर नक्षलवादी अन् मुसलमानांना दहशतवादी ठरविल्या जाते. देश काय तुमच्या बापाचा आहे काय, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
एक संधी काय मिळाली की, सगळे मोडीत काढायला निघाले. काँग्रेसवाल्यांपेक्षा महाचोर भाजपचे सरकार आहे. ज्या नागरिकांनी गॅसची सबसिडी सोडली, त्यामधून सरकारला १८ हजार कोटी रूपये वर्षाला मिळाले. हे चार वर्षांचे पैसे गेले कुठे, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
निवडणुका जवळ आल्या की, सोनिया गांधी अन् जावयाच्या भानगडी काढता. त्यांना अटक का करत नाही, हे सांगा. नुसते नाव मलीन करण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. विवाहसंस्था मोडीत काढायला हे सरकार निघाले आहे. त्याची सुरूवात मुस्लिमांपासून केली. सरकारने विवाहाला गुन्हेगारीचे स्वरूप आणले असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत देवपारे यांची अमरावती येथे व यवतमाळ लोकसभेसाठी प्रवीण पवार यांच्या उमेदवारीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले. यावेळी एमआयएमचे आ. वारीस खॉ पठाण व पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला.
मेट्रोचं मढं कुणावर येणार?
हा देश कॉपीकॅट आहे. नकल करणाºया या देशात नितीन गडकरींचा पहिला क्रमांक लागतो. नागपूरच्या ३० लाख लोकसंख्येसाठी १८ ब्रीज बांधले आणि मेट्रो आणली. कुठे गेले, काही दिसले की लहान मुलासारखा मोदींकडे हट्ट करायचा. वेगळा विदर्भ झाल्यावर मेट्रोचं मढं कोणावर येणार? महाराष्ट्रावर की विदर्भावर? मेट्रो चालली तर माणसे कुठे, यासाठी ती डेन्सीटी लागते. असा सवाल आंबेडकरांनी केला.

Web Title: The damsel was cursed by the husband only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.