सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, सिने गीत, कविसंमेलनाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 10:50 PM2018-01-24T22:50:46+5:302018-01-24T22:51:40+5:30

येथील प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव २०१८ हा २६ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

Dance, Cine songs, Kavi Sammelan banquet at the Cultural Festival | सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, सिने गीत, कविसंमेलनाची मेजवानी

सांस्कृतिक महोत्सवात नृत्य, सिने गीत, कविसंमेलनाची मेजवानी

Next
ठळक मुद्दे२६ ते २८ जानेवारीला आयोजन : अनिता दाते, अभिजित खांडकेकर यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक महोत्सव २०१८ हा २६ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण खासगी वाहिनीवरील ‘माझ्या नवºयाची बायको फेम’ अनिता दाते (राधिका) व अभिजीत खांडकेकर (गुरूनाथ) हे राहणार असल्याची माहिती आयोजक माजी आमदार सुलभा खोडके यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरिक्षक सी.जी. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सीईओ किरण कुलकर्णी, आयुक्त हेमंत पवार, सुदेश हिंगलासपुरकर आदी उपस्थित राहतील. यावेळी विदर्भस्तरीय पुष्प, वन्यजीव छायाचित्र, बचत गट उत्पादित वस्तू आणि पुस्तक प्रदर्शनीचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते होईल. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण केले जाईल. सायंकाळी ५ वाजता स्वरशोध हिंदी-मराठी विदर्भस्तरीय खुली सिनेगीत स्पर्धा व सायंकाळी ७ वाजता कवी संमेलन होणार आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ३ तर सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यत स्वरशोध सिनेगीत स्पर्धा, रात्री ७ वाजता समूह नृत्य स्पर्धा, २८ जानेवारी रोजी सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत स्वरशोध उपांत्य व अंतिम फेरी, सायंकाळी ६ वाजता कलाविष्कार स्थानिक कलावंतांचा आॅर्केस्टा होईल. पत्रपरिषदेला पी.एम. देशमुख, सुचिता खोडके, रेखा मग्गीरवार, व्ही.आर. देशमुख, संजय असोले, मिलिंद बांबल, अविनाश मार्डीकर, जयश्री मोरे, भोजराज चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Dance, Cine songs, Kavi Sammelan banquet at the Cultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.