्रप्रशिक्षण कार्यशाळेला दांडी, २८ पोलीस मुख्यालयाशी संलग्न
By admin | Published: May 3, 2016 12:20 AM2016-05-03T00:20:38+5:302016-05-03T00:20:38+5:30
प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांसह वेळेवर न पोहोचलेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.
डीसीपी आत्राम यांची कारवाई : वेतनवाढ रोखली
अमरावती : प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांसह वेळेवर न पोहोचलेल्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळी माजली आहे. पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम यांनी ही कारवाई केली.
सूत्रानुसार, सोमवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात फिंगरप्रिंटसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा ४ मे पर्यंत आहे. यात शहरातील ठाण्यात कार्यक्रम असलेल्या पोलीस जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार होते. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि सुनील वाहुरवाघ हे सोमवारी पहिल्या दिवशी ३९ पोलिसांना प्रशिक्षण देणार होते. या प्रशिक्षणासंदर्भात संबंधित ठाण्यासह सूचिबद्ध पोलिसांनाही पूर्वसूचना देण्यात आली होती.
या पोलिसांचा समावेश
मुख्यालयाशी संलग्न करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये प्रलय वाघमारे, कृष्णा गुडधे, अशोक रायबोले, सुरेंद्र भटकर, किशोर महाजन, सचिन मोहोड, शाकीर शहा, अहमद खान, प्रफुल्ल तंतरपाळे, संदीप वाकपांजर, मुरलीधर डोईफोडे, अतुल राऊत, शिवनाथ कातखेडे, इसराईल शहा, कमलेश गुल्हाने, अख्तर खां पठाण, शब्बीर, विनोद, ललित, अरविंद सोळंके, शाम मुसळे, शरद कोरडे, सुधीर दामले, रावसाहेब गवई, इंद्रजीत राठोड, राजेंद्र करमरकर, विकास मुसळे, जुगलकिशोर यादव यांचा समावेश आहे.
पूर्वसूचना देऊन महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळेला वेळेवरच पोहोचणे, अनुपस्थित राहणे, ही आदेशाची अवहेलना आहे. अनुशासन कायम ठेवण्यासाठी ही कार्रवाई करण्यात आली.
- मोरेश्वर आत्राम, पोलीस उपायुक्त, शहर आयुक्तालय