बडनेरा मार्गावर वाढलेली झुडपे धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:16 PM2018-10-01T22:16:11+5:302018-10-01T22:16:42+5:30

अमरावती ते बडनेरा मुख्य व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे झुडुपे अवाजवी वाढल्याने अक्षरश: वाहन चालकांना भिडत आहे. या झुडपांमुळे बरेच अपघात घडत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.

Danger of increased shrubs on the Badnera road | बडनेरा मार्गावर वाढलेली झुडपे धोक्याची

बडनेरा मार्गावर वाढलेली झुडपे धोक्याची

Next
ठळक मुद्देअपघात वाढले : प्रशासन गाफील, वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : अमरावती ते बडनेरा मुख्य व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे झुडुपे अवाजवी वाढल्याने अक्षरश: वाहन चालकांना भिडत आहे. या झुडपांमुळे बरेच अपघात घडत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.
वर्दळीच्या अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगत असणारे झुडपे इतकी वाढली की, ती थेट दुचाकीस्वारांना लागत आहे. रात्रीच्या वेळेस या झुडपांमागून कुत्रे आल्याने अनेक अपघात घडले. सहा महिन्यांपासून अशीच स्थिती आहे. प्रशासनाला मात्र याची दखल घ्यावीशी अद्याप वाटले नाही.
गोपालनगरच्या थांब्यापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या या झुडपाच्या ठिकाणी एकमेकांना दिसून न पडल्याने दोन दुचाकीस्वारांचा अपघात घडला.
बडनेºयातील कन्या विद्यालयासमोरून जाणाºया महामार्गावर उड्डाणपुलाच्या उतारावर अनेक झुडुपे रस्त्यावर आली आहेत. याच पुलाच्या उतारावर रेल्वे स्टेशनकडच्या टर्निंग पॉइंटवर असणारी झुडुपे अपघातप्रवण स्थळ बनले आहे. याची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, असे बडनेरावासीयांसह वाहनचालकांमध्ये कळकळीने बोलले जात आहे. असेच अपघात सुरू राहिल्यास एखाद्या वेळेला नाहक मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येऊ शकते, हे नाकारता येणार नाही. वेळेच्या आत प्रशासनाने रस्त्यावर आलेल्या झुडुपांची कटाई करावी, अश्ी मागणी आहे.

Web Title: Danger of increased shrubs on the Badnera road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.