वाहन दुरुस्तीच्या गॅरेजवर रोज निर्माण होतेय धोकादायक प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:27 AM2019-07-21T01:27:14+5:302019-07-21T01:28:14+5:30
जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे. मात्र, प्रदूषण वाढत असताना संबंधित यंत्रणेचे अधिकारी गप्प का, असा सवाल लाखो नागरिकांचा आहे.
सायलन्ससरमधून प्रचंड धूर निघणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीदरम्यान मॅकेनिकल वाहनांचे एक्सिलेटर वाढवून वायूप्रदूषण करीत आहे. ही बाब ‘लोकमत’च्या कैमेºयात कैद झाली. बाजार समितीसमोर एका गॅरेजमध्ये एका दुचाकी वाहनातून पांढरा धूर निघत होता. त्यापासून नागरिकांना विविध गंभीर आजार होत आहेत. रॉकेल मिश्रित डिझेल इंधनाचा वापर होत असल्याने धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. भेसळयुक्त इंधनातून ‘स्लफर डाय-आॅक्साईड’ व ‘नायट्रोजन डाय आॅक्साईड’ सारखे घातक घटक हवत पसरून वायूप्रदूषण होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. बुधवारी सुध्दा दर्यापूर- अमरावती मार्गावर काळी-पिवळी वाहनातून काळा धूर सोडत राजरोसपणे प्रवासी वाहतुक करीत असल्याची बाब निदर्शनास आली. गाडगेनगर येथील उड्डाणपूल चढताना एका ट्रकचा काळा धूर निघत होता. शहरात काही कालबाह्य भंगार आॅटो धावत होते.
आरटीओ घेत आहे ‘त्या’ वाहनाचा शोध
श्री. गजानन वॉटर टँकर व क्रेन सर्व्हिसेस अमरावती असे टँकरवर लिहिलेले नंबर प्लॅटवर अस्पष्ट दिसणारा एमएच ८०३१ हा ट्रक काही दिवसांपूर्वी पंचवटी चौकात गेला तेव्हा त्यातून काळ धूर निघताना कॅमेºयात कैद झाला. या ट्रकचा फोटो व वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक त्या ट्रकचा शोध घेत आहे. कारवाईच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात धावतात साडेसात लाख वाहने
आरटीओंकडे नोंदणीकृत दुचाकी, चारचाकी, अवजड आदी ७ लाख ५२ हजार ६८५ वाहने आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंतची त्या वाहनाची नोंद असून, गेल्या तीन महिन्यांत आणखी हजारो वाहनांची नोंद झाली आहे. यात ट्रक व लॉरीस ९१७७ वाहनांचा समावेश आहे. टॅक्सी म्हणून वापरल्या जाणाºया वाहनांची संख्या १८२१ आहेत. सर्वाधिक ६ लाख १८ हजार ९२३ दुचाकी वाहने जिल्ह्यात धावतात. यात हजारो वाहने कालबाह्य झाल्या आहेत. या वाहनांत भेसळ इंधनाचा वापर होत आहे. अशा वाहनचालकांवर मंडळाने कारवाईचा बडगा उगारायला हवा.